Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

लहान मुलांना कोरोनावरील लस देण्याची योजना तयार करण्यात आली आहे. त्यानुसार पेरेंटिंग ब्रँन्ड रैबिटैट द्वारे करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे की, 10 मधील 9 पालक हे आपल्या मुलांना लस देण्यास उत्सुक आहेत. रैटिबैटटने मुलांच्या लसीकरणाबद्दल पालकांचे मत जाणून घेतले. त्याचसोबत लसीकरण न झाल्यास मुलांना तुम्ही शाळेत पाठवण्यास परवानगी द्याल का असा प्रश्न सुद्धा त्यांना विचारण्यात आला. तेव्हा लसीकरण झाले असेलच तरच शाळेत पाठवू असे मत पालकांनी व्यक्त केले. 10 मधील फक्त एकाच पालकांने आपल्या मुलाचे लसीकरण करणार नाही असे म्हटले.भले ही संख्या कमी आहे पण धोका सुद्धा आहेच. कारण कोविडची हलकी लक्षणे दिसणारी मुल हे वाहक रुपात कार्य करु शकतात. त्यामुळे व्हायरस अधिक पसरु शकतो.

300 पालकांनी दिलेल्या मतामधून रैबिटैट यांना असे कळले की, 1.2 टक्के पालक हे मुलांसाठी लसीकरण महत्वपूर्ण मानत नाहीत. तर 5.6 टक्के हे अनिश्चित आणि 93.2 टक्के यांनी ते खुप महत्वपूर्ण असल्याचे म्हटले. खरंतर सर्व पालकांमधील 63.3 टक्के पालकांनी स्वत: लस घेतली आहे. उर्वरित पालकांचे लसीकरण न होण्यामागील कारण असे होते की, कोरोनावर मात करणे आणि लसीपूर्वी 60-90 दिवसांची वाट पहाणे. गर्भावस्था, स्तनपान आणि परिसरात लसीच्या डोसची कमतरतेसह स्लॉट उपलब्ध नव्हते.(भारत बायोटेकच्या Nasal Vaccine च्या दुसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलला मंजूरी)

पुढे त्यांना असे विचारण्यात आले की, ते लसीचा ब्रँन्ड/कंपनीला पसंद करतात का? त्यावर 57.4 टक्के लोकांनी कोविशिल्ड, 22.2 टक्के जणांनी कोवॅक्सिन आणि 14.8 टक्के नागरिकांनी स्पुटनिकसह 5.6 टक्क्यांनी तिघांपैकी एकाही लसीला पसंद केलेले नाही. तसेच लसीकरण संपल्यानंतर आपल्या मुलांना लस तुम्ही देण्यास इच्छुक आहात का? असे विचारले असता 89.5 टक्के पालकांनी होकार दिला तर 8.9 टक्के पालक अनिश्चित असून 1.6 टक्के पालकांनी नकार दिला.

मुलांसंबंधित सर्वाधिक मोठा विषय असा आहे की, शाळा पुन्हा सुरु करणे. तर लसीकरण हा मुलांना सुरक्षित ठेवण्यासाठी एक प्रमुख भुमिका साकारु शकतो. सर्वेक्षणात असे विचारण्यात आले की, ते मुलांना लसीकरणाशिवाय शाळेत पाठवण्यास परवानगी देतील का? तेव्हा 89.7 टक्के पालकांनी यासाठी नकार दिला. तर 10.3 टक्के पालक यासाठी सहमत होते.