उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) योगी आदित्यनाथ सरकारने (Yogi Aadityanath Government) आगामी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर 30 दिवसांचा बोनस जाहीर केला आहे. सरकारच्या या घोषणेच्या फायदा उत्तर प्रदेश सरकारच्या 14 लाख कर्मचार्यांना होणार आहे. तसेच दिवाळी सणापूर्वी कर्मचार्यांना पगार देण्याचे आदेशही सरकारकडून देण्यात आले आहेत. मीडीया रिपोर्ट्सनुसार, महागाई भत्त्यामध्ये (DA) करण्यात आलेली वाढ आणि बोनस सह पगार नॉन गॅझेट कर्मचार्यांना देणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे यंदा सरकारी कर्मचार्यांना 30 दिवसांचा मिळून सुमारे 7,000 रूपये बोनस मिळणार आहे.
उत्तर प्रदेशामध्ये 47,600 ते 1,51,100 या पे स्केलमध्ये काम करणार्या कर्मचार्यांना पूर्वी 4,800 इतका बोनस मिळत होता. पण आता सातव्या वेतन आयोगानुसार, 30 दिवसांच्या बोनस एकत्र करून कमाल 7,000 रूपये वाढीव मिळणार आहे. नक्की वाचा: 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचार्यांच्या DA वाढीनंतर 540 ते 4320 रूपयांची वार्षिक वाढ होणार.
उत्तरप्रदेशासोबतच झारखंडमध्येही राज्य सरकारने 5% महगाई भत्ता जाहीर केला आहे. 1 जुलै 2019 पासून सरकारी कर्मचार्यांना हा वाढीव महागाई भत्ता दिला जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या कॅबिनेट बैठकीत हा निर्णय मुख्यमंत्री रघुवर दास यांनी घेतला आहे. त्यामुळे त्यांना 3 महिन्यांची थकबाकी मिळणार आहे. परिणामी दिवाळीचा पगार या सरकारी कर्मचार्यांना घसघशीत मिळणार आहे.