केंद्रीय कर्मचार्यांना काही दिवसांपूर्वी मोदी सरकारच्या कॅबिनेटने महागाई भत्त्यामध्ये वाढ केल्याची घोषणा केली आहे. सातव्या वेतन आयोगानुसार आता केंद्रीय कर्मचार्यांच्या पगारात वर्षभरासाठी किमान 540 ते 4320 रूपयांची वाढ होणार आहे. कर्मचार्यांच्या श्रेणींनुसार त्यांच्या पगारात घसघशीत वाढ होणार असल्याने आता केंद्रीय कर्मचारी सुखावले आहेत. केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता आत्ता 17%; मोदी सरकारची 1.12 कोटी कर्मचारी आणि पेन्शनर्सना 'बंपर दिवाळी भेट'!
केंद्र सरकार कर्मचार्यांच्या डीए म्हणजेच महागाई भत्त्यामध्ये 5% वाढ करण्यात आली आहे. आता केंद्र सरकार कर्मचार्यांचा महागाई भत्ता 17% इतका झाला आहे. त्यामुळे देशभरातील विविध शहरांमध्ये वेगवेगळा महागाई भत्ता कर्मचार्यांच्या पगारामध्ये जोडला जाणार आहे. नव्या पगारामध्ये 5% डीए म्हणजेच महागाई भत्ता आणि त्याच्यासोबत शहरानुसार फिक्स टीए जोडला जाणार आहे.
देशातील Tier 1 शहरांमध्ये कर्मचार्यांच्या पगारात 810 ते 4320 रूपयांची वाढ होणार आहे. तर Tier 2 शहरामध्ये 540 ते 2160 रूपयांची वाढ होणार आहे. Zee Business च्या रिपोर्टनुसार, सातव्या वेतन आयोगाच्या नियमांनुसार, Tier 1 शहरांमध्ये 1350 ते 7200 रूपयांची फिक्स रक्कम आहे. तर लहान शहरांमध्ये 900 ते 3600 रूपये दरमहा मिळतात.