यंदा दिवाळीपूर्वीच मोदी सरकारने केंद्रीय कर्मचार्यांना सणाचं बंपर गिफ्ट दिलं आहे. आज (9 ऑक्टोबर) दिवशी दिल्लीत झालेल्या कॅबिनेट बैठकीत कर्मचार्यांना 5% महागाई भत्ता (Dearness Allowance) वाढवून देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील केंद्रीय कर्मचार्यांचा महागाई भत्ता आता 12% वरून 17 % इतका झाला आहे. आज झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. 7th Pay Commission Update: खुशखबर! या सरकारी कर्मचा-यांच्या DA मध्ये 8 टक्क्यांनी वाढ, 23 हजारांपर्यंत होणार पगारवाढ
मंत्रिमंडळातील बैठकीत झालेल्या या निर्णयाची माहिती केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार वाढवलेला महागाई भत्ता हा जुलै 2019 पासून दिला जाणार आहे. त्यामुळे या निर्णयाचा फायदा देशातील सुमारे 50 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 62 लाख पेन्शर्स यांना होणार आहे. तसेच सरकारच्या या निर्णयामुळे तिजोरीवर सुमारे 16 हजार कोटी रूपयांचा भार पडण्याची शक्यता आहे.
PIB ट्वीट
कैबिनेट की बैठक में महंगाई भत्ते को 5 फीसदी बढ़ाने का निर्णय, इस फैसले से लगभग 50 लाख सरकारी कर्मचारी और 62 लाख पेंशनधारी लाभान्वित होंगे @PrakashJavdekar pic.twitter.com/cpeI7jWbmy
— पीआईबी हिंदी (@PIBHindi) October 9, 2019
मागील वर्षभरात दुसर्यांदा कर्मचार्यांच्या महागाई भत्त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे. मोदी सरकारने त्यांच्या मागील पाच वर्षांच्या कार्यकाळात शेवटच्या काही दिवसांत केंद्रीय कर्मचारी आणि पेंशनर्स यांना महागाई भत्ता 12% इतका जाहीर केला होता. त्याआधी तो 9% होता. त्यावेळेस सरकारी तिजोरीवर 9168.12 कोटी भार पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला होता.