7th Pay Commission Update: खुशखबर! या सरकारी कर्मचा-यांच्या DA मध्ये 8 टक्क्यांनी वाढ, 23 हजारांपर्यंत होणार पगारवाढ
(File Photo)

यंदाची दिवाळी ही केंद्रीय कर्मचा-यांसाठी खूपच धमाकेदार असणार आहे असे म्हणायला हरकत नाही. दिवाळीआधी रोज या कर्मचा-यांच्या सातव्या वेतन आयोगानुसार (7th Pay Commission) भरघोस वाढ होणार असल्याच्या बातम्या कानांवर येत आहेत. इन खबर ने दिलेल्या नवीन माहितीनुसार, दिवाळीआधीच हिमाचल प्रदेशच्या रोडवेज सरकारी कर्मचा-यांच्या DA मध्ये 8 टक्क्यांनी वाढ होणार आहे. या वाढीमुळे येथील 12000 कर्मचा-यांच्या पगारात 23,000 पर्यंत वाढ (Salary Hike) होण्याची शक्यता आहे. हिमाचल रस्ते परिवहन निगम ने अलीकडेच आपल्या मागण्यांसाठी एक बैठक आयोजित केली होती. त्यावेळी पगारातील अन्य एरियर्सविषयी चर्चा करण्यात आली.

या बैठकीत 1800 कॉन्ट्रॅक्ट ड्रायव्हर आणि कंडक्टर्सच्या पगारात वाढ करण्याची मागणी केली होती. सध्या कंडक्टरांना 5500 रुपये तर बसचालकााल 7200 रुपये प्रति महिना मिळतो. मात्र आता कंडक्टर्सना 7810 रुपये आणि बसचालकांना 8310 रुपये इतका महिना पगार मिळेल.

त्याचबरूप रात्रपाळी करुन ओव्हरटाईम करणा-या कर्मचा-यांना दर महिन्याच्या 22 तारखेला वेतनभत्ता द्यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच दिवाळीआधीच कर्मचा-यांना डीए आणि एरियर मिळणार. तसेच केंद्रीय कर्मचारी सुद्धा आपला DA वाढण्याच्या प्रतिक्षेत आहे. या गोष्टीला थोडा उशीरच झाला आहे. त्यांच्या डिअरन्स अलाउंन्समध्ये 5% ची वाढ झाली तर त्यांच्या पगारात 900 ते 12,500 रुपयांपर्यंत वाढ होईल. हेदेखील वाचा- 7th Pay Commission Update: खुशखबर! केंद्रीय कर्मचा-यांना सरकारकडून मिळणार दिवाळीचे खास गिफ्ट, महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता

याआधी केंद्र सरकारच्या सेवेत असणाऱ्या श्रेणी ब आणि श्रेणी क तसेच राजपत्रित नसलेले कर्मचारी (Non-Gazetted Staff) या मंडळींना नॉन प्रॉडक्ट लिंक्ड बोनस (Non Product Linked Bonus) रुपात बंपर बोनस मिळणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आता या कर्मचाऱ्यांना आता दिवाळी बोनसही मिळणार आहे. महत्त्वाचे म्हणजे जे कर्मचारी नॉन प्रोडक्ट लिंक्ड बोनस (Non Product Linked Bonus) घेण्यासाठी पात्र नसतील अशा कर्मचाऱ्यांनाही दिवाळी बोनस मिळणार आहे.

प्राप्त माहितीनुसार ही भेट केवळ 'अ श्रेणी ' आणि 'ब श्रेणी' कर्मचाऱ्यांसाठीच आहे. अशीही चर्चा आहे की, या कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्ता (Dearness Allowance) 26 महिन्यांची थकबाकी  (Months Arrears) थकबाकीही सोबत मिळणार आहे. म्हणजेच या कर्मचाऱ्यांची यंदाची दिवाळी धुमधडाक्यात साजरी होणार आहे.