Money | Representative Image (Photo Credits: Pixabay)

केंद्रीय सेवेत (Central Civil Services) काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर (Good News) आहे. येत्या 1 जुलै 2021 पासून केंद्रीय सेवेतील कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता (Dearness Allowance) आणि 'डीए' (DA) असा पूर्ण लाभ मिळणार आहे. हा लाभ केंद्रीय सेवेत असलेले कर्मचारी, निवृत्त कर्मचारी आणि सेवानिवृत्ती घेत असलेल्यांना मिळमार आहे. त्यामुळे सहाजिचक या सर्वांना वेतनरुपी मिळणाऱ्या मासिक उत्पन्नात घसघशीत वाढ होणार आहे. केंद्रीय अर्थराज्यमंत्री अनुराग ठाकुर (Anurag Thakur) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला असून, या आयोगाच्या शिफारशीनुसार 11% वाढ मिळणार आहे.

केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना सध्या 17% डीए मिळतो. जुलै 2019 पासून डीएची ही पातळी प्रभावी झाली. गेल्या वर्षी सरकारने डीएमध्ये 4% टक्क्यांनी वाढ करून त्यास 21% पर्यंत मान्यता दिली होती.1 जानेवारी 2020 पासून ही अंमलबजावणी होणार होती. जून 2020 मध्ये 3 % वाढ झाली होती आणि जानेवारी 2021 मध्ये महागाई भत्ता पुन्हा एकदा 4% नी वाढविण्यात आला. म्हणजेच कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारक सध्या 28% डिए मिळण्यास पात्र आहेत. (हेही वाचा, 7th Pay Commission: केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; जुलैपासून मिळू शकतो अधिक पगार, महागाई भत्त्यात वाढ होण्याची शक्यता)

कोविड 19 या साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर डीए मधील मागील तीन वाढी रद्द करण्यात आल्या. सरकारने यावर्षी मार्चमध्ये त्यांची परतफेड 1 जुलैपासून करण्याची घोषणा केली होती. त्यामुळे केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना भत्त्यांमध्ये मोठी वाढ अपेक्षीत आहे. या व्यतिरिक्त, सरकारने जूनमध्ये डीएमध्ये आणखी एक भाडे वाढवण्याची घोषणा केली तर भत्ता आणखी वाढू शकतो.