पीएमसी बँकेच्या थकबाकी भरण्यासाठी, रिअल इस्टेट कंपनी एचडीआयएलच्या मालमत्ता विक्रीच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाकडून रोख. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे, न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला.

 9 फेब्रुवारीला महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंबईत मोर्चा काढणार आहे. त्याचवेळी पुण्यातही शनिवारी मनसेने बाइक रॅलीचे आयोजन केले आहे. परंतु, पोलिसांनी या रॅलीला परवानगी नाकारली आहे. कायदा व सुव्यवस्थेचा विचार करून ही परवानगी नाकारली आहे. मात्र तरी आपण रॅली काढणार अशी भूमिका मनसेने घेतली आहे. 

मुंबईची सुरक्षा पाहता महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी, मुंबईत सीसीटीव्ही बसविण्याच्या नियमात बदल करत आता, मुंबईतील सर्व इमारतींवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा नवा नियम बनविला जाणार असल्याची माहिती दिली. 

9 फेब्रुवारी रोजी नियोजित मनसेच्या महामोर्चाच्या आधी मनसैनिक, पदाधिकारी यांना पोलिसांनी नोटीस धाडली आहे. परळ, काळाचौकी परिसरात 9 तारखेच्या मोर्चात लोकांना सहभागी होण्याचं आवाहन करण्यासाठी अनेक चौकसभा घेतल्या जातायेत, या सभांमध्ये कोणतेही गैरकृत्य किंवा शांतता, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास मनसेच्या आयोजक पदाधिका-यांना जबाबदार धरले जाईल असे सूचित करण्यात आले आहे, त्यानुसार कलम 149 ची नोटीस काळाचौकी पोलिस ठाण्याकडून बजावण्यात आल्याचे समजतेय  

संत, महंत, वारकरी संप्रदायाची परंपरा पुढे नेण्यासह वारकरी संप्रदायाचे संस्कार नवीन पिढीला मिळण्यासाठी पैठण येथे संत विद्यापीठ सुरु करणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. विद्यापीठामध्ये वारकरी व संत वाङ्‌मयाचा एकत्रित अभ्यासक्रम तयार करण्यासाठी समिती स्थापणार असल्याचे सामंत यांनी सांगितले.   

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची तयारी युद्धपातळीवर सुरू असून प्रशासनाने सहा महिन्यांचे काम अवघ्या 35 दिवसांत पूर्ण केले आहे. अशी माहिती देताना 15 एप्रिल पर्यंत संपूर्ण अंमलबजावणी करावी असा आदेश आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.  

दिल्ली विधानसभा निवडणूक मतदानाला काहीच तास शिल्लक असताना अरविंद केजरीवाल यांना निवडणूक आयोगाकडून आचारसंहितेची पायमल्ली करण्याच्या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. केजरीवाल यांनी ट्विटर वर शेअर केलेल्या एका व्हिडिओतून नियमाचा भंग  होत असल्याचे आयोगाने नोटीस मध्ये सांगितले आहे.

कोरोना व्हायरस पसरत असताना चीन मध्ये अडकलेल्या भारतीयांचे रक्षण करण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाकडून वुहान येथून भारतीयांना मायदेशी परत आणले जात आहे, अजूनही 80 भारतीय विद्यार्थी हे वुहान मध्ये अडकून पडले आहेत , यातील 10 जण हे भारतात परतण्यासाठी विमानतळावर सुद्धा पोहचले होते मात्र त्यांना तीव्र ताप असल्याने त्यांना चीनमधील अधिकाऱ्यांनी प्रवास करण्यापासून रोखले होते. 

न्यायाधीश कृष्ण कांत शर्मा यांच्या पत्नी व मुलाच्या हत्या प्रकरणात दोषी महिपाल याला पंजाब  हरियाणा कोर्टाकडून फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

इंडियन आर्मीच्या कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनीअरिंगने जगातील पहिले हेल्मेट विकसित केले आहे जे 10 मीटरच्या अंतरावरुन AK -47 बुलेट रोखू शकते. त्याचे वजन फक्त 1.4 किलो आहे.

Load More

राफेल विमान खरेदी व्यवहारावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काँग्रेस नेते यांनी त्यांच्या भाषणामधून चौकीदार चोर असल्याचे वादग्रस्त वारंवार केले आहे. तर या प्रकरणी आता पुन्हा राहुल गांधी यांना गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयाने फौजदारी कारवाई तरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच 15 फेब्रुवारीला कोर्टासमोर हजर राहण्याचे निर्देशन दिले आहेत. राहुल गांधी यांना दुसऱ्यांदा समन्स कोर्टाकडून पाठवण्यात आले आहेत.

डोंबिवली मधील एमआयडी येथील रस्ते रासायनांमुळे गुलाबी झाल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे नागरिकांना त्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या ठिकाणी भेट देत रासायनिक कंपन्यांनी सुरक्षा उपकरणे लावा नाहीतर टाळे ठोका असा इशारा दिला आहे.

आजच्या दिवसभरातील ठळक बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचण्यासाठी 'लेटेस्टली मराठी' ला अवश्य भेट द्या.

शिवसेनेचे माजी मंत्री रविंद्र वायकर यांची मुख्यमंत्री कार्यालयात नियुक्ती करण्यात आली आहे. वायकर यांच्यासाठी मुख्य समन्वयक अधिकारी पदाचे काम सोपवण्यात आल्याने पक्षातील नाराज आमदरांसह सीएमओ कार्यालयातील अधिकाऱ्यांना धक्का बसला आहे.