शिकारा चित्रपट पोस्टर (Photo Credits: Instagram)

विधु विनोदा चोपड़ा यांचा आगामी चित्रपट 'शिकारा: द अनटोल्ड स्टोरी ऑफ कश्मीरी पंडित' (Shikara: The Untold Story of Kashmiri Pandits) विरोधात जम्मू-कश्मीर हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. हा चित्रपट प्रदर्शित करण्यावर बंदी आणि त्यामधील काही दृश्ये हटवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. शिकारा हा चित्रपट येत्या 7 फेब्रुवारीला प्रदर्शित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. न्यायालयात याचिका पत्रकार माजिद हैदरी, इफ्तिखाक मिसगर आणि वकिल इरफान हाफिज लोन यांनी दाखल केली आहे. यांनी न्यायालयात याचिका दाखल करत असे म्हटले आहे की, शिकारा चित्रपट स्थानिक कश्मीरी मुस्लिम समुदायाबाबत वाईट गोष्टी पसरवत असल्याचा प्रयत्न करत आहे. यामुळे स्थानिकांच्या भावना दुखावल्या जात असल्याने चित्रपट प्रदर्शित होण्यावर बंदी घालण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

शिकारा चित्रपटात घाटी ते कश्मीरी पंडित आणि कश्मीरी मुस्लिम यांच्याबाबत दृश्य दाखवण्यात आले आहेत. यामुळे देशातील सांप्रदायिक संवादामध्ये तणाव येऊ शकतो. त्यामुळेच चित्रपटावर बंदी घालण्यात यावी.दरम्यान, विधु विनोद चोपडा यांच्या शिकारा चित्रपटाची कथा कश्मीर येथून पलायन करणाऱ्यासाठी मजबूर झालेल्या कश्मीरी पंडितांवर आधारित आहे. तर कश्मीर येथे राहणाऱ्या एका प्रेमप्रकरावर असून चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर त्याचा विरोध करण्यास सुरुवात झाली होती. या चित्रपटात मुख्य भुमिकेत आदिल खान दिसून येणार असून तो सुद्धा वादाच्या भोवऱ्यात अडकला गेला आहे.(अदनान सामी यांची पद्मश्री पुरस्कारावरून सुरु असणाऱ्या वादावर प्रतिक्रिया; विरोध करणाऱ्यांना विचारला 'हा' एकच सवाल)

चित्रपटाचे शूटिंग वास्तविक ठिकाणांवर शूट करण्यात आले आहे. त्यामध्ये 4 हजारांपेक्षा अधिक वास्तविक कश्मीरी पंडित असून त्यांना भीतीचा सामना करावा लागत आहे. मात्र अद्याप चित्रपट निर्मात्यांकडून कायदेशीर कारवाई बाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.