अदनान सामी यांची पद्मश्री पुरस्कारावरून सुरु असणाऱ्या वादावर प्रतिक्रिया; विरोध करणाऱ्यांना विचारला 'हा' एकच सवाल
Adnan Sami (Photo Credits: ANI)

प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार 2020 (Padma Puraskar 2020) जाहीर करण्यात आले आहेत. यंदा यामध्ये प्रसिद्ध गायक अदनान सामी (Adnan Sami) सोबत 118 व्यक्तींना पद्मश्री जाहीर करण्यात आला, मात्र यावरून एक नवा वाद सुरु होत सामी यांच्याकडे भारताचे नागरिकत्व नसून ते देशाचे रहिवाशी नसताना भारताचा सर्वोच्च पुरस्कार कसा काय दिला जाऊ शकतो असा प्रश्न अनेकांनी उचलला होता, यामध्ये काँग्रेस (Congress), मनसे (MNS)  या राजकीय पक्षांचा देखील तीव्र विरोध दिसून आला मात्र आता या वादावर भाष्य करत अदनान सामी यांनी विरोधकांना एकच सवाल केला आहे. माझे वडील हे 1965 च्या लढाईत पाकिस्तान (Pakistan) कडून एक फायटर पायलट म्ह्णून लढले होते, त्यांनीही त्यावेळी स्वतःच्या मायदेशासाठी कर्तव्य पार पाडले, त्यासाठे नेत्यांना पुरस्कारही देण्यात आला मात्र त्यांच्या पाकिस्तानी असण्याचा संबंध माझ्याशी का जोडला जातोय, हा कोणत्या जगातील प्रकार आहे जिथे वडिलांच्या कामासाठी मुलाला दोष लावला जातोय? अशा शब्दात अदनान सामी यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.

अदनान सामी यांनी आपल्याला मिळालेल्या पुरस्कारासाठी सरकारचे आभार मानत आनंद देखील व्यक्त केला. आपण केलेल्या कामासाठी गौरविले जाणे हे भाग्य आहे आणि ज्यांना यात विरोध कार्याचं त्यांचे माझ्या लेखी काहीही महत्व नाही कारण लोकांचं काम बोलणं आहे आणि ते बोलतच राहणार असेही सामी यांनी ANI शी बोलताना म्हंटले आहे.(हेही वाचा: Padma Award 2020: अरुण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नांडिससह 7 जणांना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर; पहा संपूर्ण यादी)

दरम्यान, 26 मे 2015 रोजी पाकिस्तानी पासपोर्टची मुदत संपल्यावर, सामीने त्याचे नूतनीकरण केले नाही. त्यानंतर 1 जानेवारी 2016 पासून अदनान सामीला भारतीय नागरिकत्व देण्यात आले. पाकिस्तानमधील लाहोरमध्ये जन्मलेला सामी, 13 मार्च 2001 रोजी प्रथम एक वर्षाच्या प्रवासी व्हिसावर भारतात आला होता. त्यामुळे 'मूळ भारतीय नागरिक नसलेल्या अदनान सामीला भारत सरकारने कोणताही पुरस्कार देऊ नये, असे म्हणत हा पुरस्कात त्वरित मागे घेण्यात यावा अशी मागणीही विरोधकांनी केली आहे.