Padma Award 2020: अरुण जेटली, सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नांडिससह 7 जणांना पद्म विभूषण पुरस्कार जाहीर; पहा संपूर्ण यादी
Former Union Ministers Arun Jaitley, Sushma Swaraj and George Fernandes. (Photo Credit: PTI)

प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) पूर्वसंध्येला पद्म पुरस्कार (Padma Award 2020) जाहीर करण्यात आले आहेत. 7 व्यक्तींना पद्म विभूषण (Padma Vibhushan 2020) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्याचबरोबर 16 सेलिब्रिटींना पद्मभूषण (Padma Bhushan) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, तर 118 व्यक्तींना पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri Awards 2020) सन्मानित करण्यात आले आहे. ज्या सात व्यक्तींना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाले आहेत, त्यात माजी केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि सुषमा स्वराज यांचा समावेश आहे.

माजी केंद्रीय मंत्री जॉर्ज फर्नांडिस, मनोहर पर्रीकर, चन्नूलाल मिश्रा आणि महिला बॉक्सर एमसी मेरी कॉम यांनाही पद्मविभूषण जाहीर झाला आहे. अरुण जेटली, सुषमा स्वराज आणि जॉर्ज फर्नांडिस यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्यात येईल.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी (25 जानेवारी) संध्याकाळी सर्व पुरस्कारांना मान्यता दिली. हे पुरस्कार त्या खास लोकांना देण्यात येत आहेत, जे समाजाच्या विकासासाठी सर्जनशील आणि विलक्षण कार्य करून लोकांसाठी एक उदाहरण बनले आहेत.

पद्म भूषणचे मानकरी - मुजफ्फर हुसेन बेग, अजय चक्रवर्ती, मनोज दास, बालकृष्ण दोषी, कृष्णाम्मल जगन्नाथन, मुमताज अली, सैयद मुआजेम अली (मरणोत्तर), एससी जमिर, अनिल प्रकाश दोषी, सेरिंग नंडोल, आनंद महिंद्रा, नीलकंठ रामकृष्ण माधव मेनन (मरणोत्तर), मनोहर पर्रिकर, प्रो जगदीश सेठ, पीवी सिंधु, वेणु श्रीनिवासन (हेही वाचा: देशातील 1040 पोलीस कर्मचाऱ्यांना President's Police Medal जाहीर; महाराष्ट्रातील 54 जणांचा समावेश)

पद्मश्री मध्ये एकता कपूर, कंगना रनौत, अदनान सामी सोबत 118 व्यक्तींची नावे आहेत. बाबा जगदीश लाल आहूजा, सामाजिक कार्यकर्ते सत्यनारायण मुनडयूर, सामाजिक कार्यकर्ते जावेद अहमद टेक, सामाजिक कार्यकर्ते एस रामकृष्ण, सामाजिक कार्यकर्ते योगी एरोन, महाराष्ट्राच्या बीजमाता राहीबाई पोपरे, पोपटराव पवार यांना पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्टाला एकूण 13 पद्म पुरस्कार प्राप्त झाले आहेत, यामध्ये 1 पद्मभूषण आणि 12 पद्मश्रीचा समावेश आहे.