
71 व्या प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day 2020) पूर्वसंध्येला केंद्रीय गृहमंत्रालयाने, आज राष्ट्रपती पोलिस पदक (President's Police Medal), जीवन रक्षा पदक, अग्निशमन सेवा पदक, नागरीसेवा दल पदक आदींची घोषणा केली. देशातील 1040 पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 54 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी पुरस्कारांच्या यादीमध्ये 126 पदकांसह सर्वाधिक शौर्य सन्मान जिंकले आहेत, तर केंद्रीय राखीव पोलिस दलाने (सीआरपीएफ) ने 76 पदे प्राप्त करून दुसरे स्थान मिळवले आहे.
आज, देशातील 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलिस शौर्य पदक, 286 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलिस शौर्य पदक, 93 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना विशिष्ठ सेवा पदक आणि 657 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहे. महाराष्ट्राला यातील 54 पदके प्राप्त झाली आहेत. गेल्या वर्षी महाराष्ट्राला 46 पदे मिळाली होती. यंदा राज्यातील 10 पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक, 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक, तर 40 पोलिसांना गुणवत्ता सेवा पदक जाहीर झाले आहे.
पदक प्राप्त झालेले शूरवीर -
शौर्य पदक - मिठू नामदेव जगदाळे, सुरपत बावाजी वड्डे, आशिष मारूती हलामी, विनोद राऊत, नंदकुमार अग्रे, एमसीव्ही महेश्वर रेड्डी, समीरसिंह साळवे, अविनाश कांबळे, वसंत अत्राम, हमीत डोंगरे
विशिष्ठ सेवा पदक – अर्चना त्यागी (आयपीएस), संजय सक्सेना (आयपीएस), शशांक सांडभोर (सहा.पोलिस आयुक्त), वसंत साबळे (सहा.पोलिस निरिक्षक)
गुणवत्ता सेवा पदक - धनंजय कुलकर्णी, नंदकुमार ठाकूर, अतुल पाटील, नंदकिशोर मोरे, स्टीव्हन मॅथ्यूस अॅन्थोनी, निशिकांत भुजबळ, चंद्रशेखर सावंत, मिलिंद तोतरे, सदानंद मानकर, मुकुंद पवार, संभाजी सावंत गजानन, काबदुले कयुमरेज इराणी, निलिमा अराज, इंद्रजित करळे, गौतम पातरे, सुभाष भुजंग, सुधीर दळवी, किसन गायकवाड, जमील सय्यद, मधुकर चौगुले, भिकन सोनार, राजू आवताडे, शशिकांत लोखंडे, अशफाक अली, चिश्तिया वसंत तराटे, रविंद्र नुल्ले, महेबूबअली सय्यद, साहेबराव राठोड, दशरथ चिंचकर, लक्ष्मण टेंभूर्णे, बटुकलाल पांडे, विष्णू गोसावी, प्रदीप जांभळे, चंद्रकांत पाटील, भानुदास जाधव, नितीन मालाप, रमेश शिंगाटे, बाबुराव बिर्हाडे, संजय वायचळे
दरम्यान, गृह मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस शौर्य पदकात झारखंड (32), ओडिशा (16), दिल्ली पोलिस (12), महाराष्ट्र (10), छत्तीसगड (8), बिहार (7) पंजाब (4) आणि मणिपूर (2) यांचा समावेश आहे.