कर्जमाफी केलेल्या 34 लाख शेतकऱ्यांना दिलासा, नावानिशी शासन यादी जाहीर करणार
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारची सत्ता स्थापन झाल्यानंतर विकास कामांना वेग आला आहे. याच पार्श्वभुमीवर काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार असल्याचे जाहिर केले होते. तर आता कर्जमाफी केलेल्या 34 लाख शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून शासनाकडून नावानिशी यादी लवकरच झळकवणार आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी ही 29 हजार 712 कोटी रुपये असणार आहे. या कर्जमाफीचा फायदा 10 सप्टेंबर 2019 पर्यंत दोन लाख रुपयांची थकबाकी असणाऱ्यांना मिळणार आहे.

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जमाफीची नावे शासनाच्या बेवसाईटवर 15 फेब्रुवारी पासून जाहीर करण्यात येणार आहेत. तर मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कर्जमाफी योजनेची अंमलबजावणी सुरु होणार आहे. ही कर्जमाफी 'महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने'अंतर्गत मार्च 2020 पासून लागू होणार आहे. परंतु, या कर्जमाफी योजनेत अनेक अटींचा समावेश आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी केली. तेव्हा ठाकरे यांनी शेतकऱ्यांना मी तुम्हाला पूर्णपणे चिंतामुक्त आणि कर्जमुक्त करणार असल्याचे आश्वासन दिले होते.(महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजना निकष,अटी, पात्रता याबाबत जाणून घ्या महत्त्वाच्या बाबी)

नागपूरातील हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी कामकाजाबाबत बोलताना त्यांनी ग्रामीण विभागातील मुद्दे मांडले होते. त्याचवेळी नवे सरकार ग्रामीण विभागात CMO ऑफिस सुरु करणार असल्याने त्यांना मदत मिळणार आहे. दुसऱ्या बाजूला धान उत्पादनातर्फे शेतकऱ्याला अधिक 200 रुपये मिळणार असल्याचे ही म्हटले होते.