Coronavirus Update (Photo Credit: Twitter)

Coronavirus Update In India: देशात 24 तासात कोरोनाचे 24,248 रुग्ण आढळले आहेत, तसेच 425 मृत्यूंची नोंद झाली आहे. यानुसार भारतातील कोरोना बाधितांची संख्या 6,97,413 वर पोहचली आहे. यात 2,53,287 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, 4,24,433 रुग्ण हे डिस्चार्ज मिळवलेले आहेत तर आतापर्यंत 19,693 जणांचा कोरोनाने बळी गेला आहे. या संदर्भात आरोग्य मंत्रालयातर्फे माहिती देण्यात आली आहे. देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या यादीत अजूनही महाराष्ट्र (Maharashtra)  पहिल्या स्थानी आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे तब्ब्ल 2 लाख 6 हजार 619 रुग्ण आढळले असून यापैकी 8 हजार 822 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 1 लाख 11 हजार 740 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. Coronavirus: कोरोना व्हायरस रुग्णांच्या बाबतीत भारत जगात तिसऱ्या स्थानावर; रशियाला टाकले मागे, लवकरच पार करणार 7 लाख रुग्णांचा टप्पा

ICMRच्या माहितीनुसार, देशात कोरोनाच्या चाचण्या अधिक प्रमाणात होत आहेत. काल, ५ जुलै च्या अपडेट नुसार, देशात आतापर्यंत 99,69,662 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. यापैकी 1,80,596 चाचण्या तर केवळ 24 तासात झाल्या आहेत. यापैकी आता जवळपास ७ लाख चाचण्या पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. याची टक्केवारी पाहायला गेल्यास आणि देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत कोरोना रुग्णांची संख्या अजूनही कमी आणि नियंत्रणात आहे.

ANI ट्विट

दरम्यान, देशात कोरोना बाधितांच्या संख्येत आता महाराष्ट्राच्या पाठोपाठ तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश येथे सर्वाधिक ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. काही दिवसांपूर्वी टॉप 5  मध्ये असलेल्या गुजरात मध्ये आता परिस्थिती बरीच नियंत्रणात आली आहे तर दिल्ली मधील कोरोनाची आकडेवारी सुद्धा घटली आहे.