झारखंडमध्ये आज 345 नवे कारोना बाधित रुग्ण, तर 4 जणांचा मृत्यू ; 28 ऑक्टोबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Oct 28, 2020 11:34 PM IST
मराठा आरक्षण स्थगिती याचिकेवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा पुढे ढकलली. त्यामुळे आरक्षणाचे घोंगडे पुन्हा एकदा काही काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहे. आरक्षण मिळणार की नाही याबत कोणती स्पष्टता झाली नाही. त्यामुळे अनेकांचा जीव टांगणीला लागला आहे. त्यामुळे या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी सर्वच जण आग्रही आहेत. त्यामुळे आता पुढच्या महिन्यात होणाऱ्या सुनावणीवेळी काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोरोना काळात घेण्यात आलेल्या लॉकडाऊन हळूहळू शिथिल होत आहे. अशा वेळी अनेक गोष्टी पुर्ववत सुरु झाल्या आहेत. परंतू, अद्यापही मंदिरे, शाळा अद्याप बंद आहेत. अशात कोरोना रुग्णांची संख्याही वाढताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक दक्षता घेणे आवश्यक आहे. राज्यातील राजकीय मंडळींनाही कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाण वाढले आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कोरोना व्हायरस संसर्ग झाला. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही कोरोना व्हायरस चाचणी पॉझिटीव्ह आली. त्यासोबतच सुनील तटकरे आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनाही कोरोना व्हायरस संसर्ग झाल्याचे पुढे आले. त्यामुळे सर्वांनीच काळजी घेणे अधिक गरजेचे बणले आहे.
केंद्र सरकारने मंगळवारी एक अधिसूचना कढली. या अधिसूचनेनुसार आता जम्मू काश्मीरमध्ये भारतीय नागरिकांना अधिवासाच्या दाखल्याशिवाय जमीन खरेदी करता येणार आहे. केंद्र सरकारने केंद्र शासित प्रदेशाला नवी चालना देण्यासाठी हे आदेश काढल्याचे सांगण्यात येत आहे.
गेले प्रदीर्घ काळ राज्याच्या विधानपरिषदेतील राज्यपाल नियुक्त जागा रिक्त आहेत. या जागांवर कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे. दरम्यान, उद्या (गुरुवार, 29 ऑक्टोबर) या प्रस्तावावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यातील पर्जन्यवृष्टीबाबत आणखी एक महत्तवाची माहिती पुढे आली आहे. ऑक्टोबर महिन्यात संबंध देशभर पडलेल्या पावसात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. समुद्रात झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले. त्यामुळे महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात मुसळधार पाऊस पडला होता.
दरम्यान, कोरोनाव व्हायरस, राजकारण, अर्थकारण, खेळ, उद्योग, कृषी, गुन्हे आणि यांसह विविध क्षेत्रातील ताज्या घटना घडामोडी तपशीलासह जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग सोबत जोडलेले राहा.