कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि लॉकडाऊन (Lockdown) गेल्या 7 महिन्यांपासून मुंबईची जीवनवाहिनी समजली जाणारी लोकल सेवा (Mumbai Local Service) सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळता अन्य कुणालाही रेल्वे प्रवास करण्याची मुभा नव्हती. त्यानंतर अलीकडेच सर्व महिलांसाठी ही रेल्वे सेवा सुरु करण्यात आली. यावर पुरुष प्रवाशांनी नाराजी व्यक्त करत एका ट्विटर युजरने सर्वसामान्यांसाठी रेल्वे सेवा का करत नाही असा प्रश्न विचारला होता. या प्रश्नाला मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी उत्तर देत आम्ही लवकरच यावर निर्णय घेऊ असे सांगितले आहे.
ट्विटरवर एका पुरुष प्रवाशाने 'याआधी महिलांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली, आता वकिलांनाही देण्यात आली आहे. मग व्यावसायिक, कर्मचारी आणि सामान्य माणसांना का नाही? दिवाळी सणात प्रवास नाकारणं खूप मोठा अन्याय आहे' असा प्रश्न विचारला होता. यात त्याने रेल्वेमंत्री पियुष गोयल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विजय वडेट्टीवार यांना टॅग केले होते. हेदेखील वाचा- Mumbai local: मुबई लोकलमधून प्रवासाठी सर्वांनाच मिळणार परवाणगी! रेल्वे आणि राज्य सरकार यांच्यात आज पार पडणार बैठक
Dear Sir @CMOMaharashtra @OfficeofUT
Earlier Women allowed to travel in Mumbai Locals. Now Lawyers allowed too. Why disallow businessmen employees common man❓ Its BIG INJUSTICE to block @mumbairailusers in Diwali season.@PiyushGoyal @AUThackeray @VijayWadettiwar @DrSEShinde pic.twitter.com/TeaiOEe3Qd
— M. K. Ludhwani (@m_ludhwani) October 27, 2020
यावर विजय वडेट्टीवार यांनी उत्तर देत 'पुढील काही दिवसांत सर्वांसाठी लोकल सुरु करण्याचा निर्णय घेऊ' असं सांगितलं आहे. त्यांचे हे उत्तर त्या युजर्ससाठी आणि सर्व मुंबईकरांसाठी दिलासादायक आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून लोकल सेवा बंद असल्यामुळे लॉकडाऊनमध्ये बसने प्रवास करणा-या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे सेवा सुरु नसल्याने बस मध्ये गर्दी पाहायला मिळत आहे. त्यात हळूहळू अनलॉकच्या टप्प्यात ऑफिसेस सुरु होत असल्याने गर्दी वाढत आहे. म्हणून लवकरात लवकर सर्वांसाठी रेल्वे सेवा सुरु करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
महाराष्ट्रात काल दिवसभरात 5.363 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 7836 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे राज्यात कोरोना रुग्ण वाढीचे प्रमाण घटत असून मुंबईतही हे प्रमाण कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.