Mumbai Health Update: मुंबई शहरामध्ये पाठिमागील काही दिवसांपासून गॅस्ट्रो (Gastro) रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे पाठिमागच्या म्हणजेच सन 2022 च्या तुलनेत यंदा 2023 मध्ये ग्रॅस्ट्रोच्या रुग्णांची संख्या अधिक वाढली आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 6,677 रुग्णांची आरोग्य विभागाकडे नोंद झाली आहे. पाठिमागच्या वर्षांच्या तुलनेत यंदाच्या वर्षी रुगणवाढीचे प्रमाण 20% इतके आहे. वातावरणात होणारा सततचा बदल, चुकीचा आहार (Poor Nutrition) आणि जीवनशैली (Improper Lifestyl) आदिंचाही नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होतो आहे. त्यामुळे मुंबईकरांमध्ये पोटदुखीच्या तक्रारी बळावत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणने आहे.
मुंबई शहरात जुन महिना सुरु झाला की, साधारण पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यापासून पाऊस सुरु होतो. यंदा मात्र जून मध्यावर आला तरीही शहरात पावसाचा हलासा शिडकावही पुरेशा प्रमाणातत नाही. त्यामुळे वातावरणात प्रचंड उष्मा आहे. ज्यामुळे नागरिकांच्या जीवाची काहीली होते आणि अंगातून घामाच्या धारा वाहतात. परिणामी नागरिक वाढत्या तापमानावर उतारा म्हणून उसाचा रस, शितपेये, बर्फाचे खडे, थंड पाणी याचे अतिरेकी सेवन करतात. त्यामुळे नागरिकांना पोटाच्या तक्रारी उद्भवतात. नागरिकांना अन्नातून विषबाधा, संसर्ग आदींमधून विषाणू संसर्ग होतो. याचे वेळीच निदान झाले नाही तर मग पुढे आजाराची तीव्रता अधिक वाढते. परिणामी एकाच वेळी अनेक लोक आजारी पडतात, याकडे तज्ज्ञ लक्ष वेधतात.
नागरिकांना पोटाशी संबंधीत विकार टाळायचा असेल तर आहार आणि जीवनशैलिकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. प्रामुख्याने बाहेरच पदार्थ खाणे टाळावे. शक्यतो बंदच केले तर उत्तम. बाहेरचे पाणी पिणेही टाळणे केव्हाही चांगले. घरच्या आहारामध्ये योग्य प्रमाणात कार्बोदके, प्रथिने आणि जीवनसत्वे असतील याची अधिक काळजी घ्यावी. चुकीच्या आहारामुळे शौचास साफ न होणे. त्यामुळे अपचन, वायू (गॅस), पित्त आदी तक्रारी संभवतात. त्याकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्या पुढे बळावण्याचीही शक्यता असते, असे आहारतज्ज्ञ सांगतात.
गॅस्ट्रोचा आजार प्रामुख्याने पचनसंस्थेवर परिणाम करतो. याची कारणे आणि लक्षणे तीव्रतेनुसार बदलू शकतात. उगड्यावरचे पदार्थ खाणे, शिळे अथवा बुरशी आलेले पदार्थ खाणे, दुषीत पाणी पिणे आदी कारणांमुळे याची लागण होते. गॅस्ट्रोची लागण झाल्यानंतर ओटीपोटात दुखणे, गोळा येणे, मळमळ, उलट्या होणे, अतिसार, बद्धकोष्ठता, छातीत जळजळ आणि आतड्यांसंबंधी हालचालींमध्ये बदल आदी लक्षणे किंवा त्रास रुग्णांमध्ये दिसू शकतात.