Coronavirus Update In India: भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येने आज 31 लाखाचा टप्पा पार केला आहे. केंद्रीय आरोग्य मंंत्रालयाच्या माहितीनुसार (Union Health Ministry) मागील 24 तासात कोरोनाच्या रुग्णसंख्येत 60,975 नव्या रुग्णसंख्येची भर पडली आहे. यानुसार देशातील कोरोना रुग्णांंचा आकडा 31,67,324 वर पोहचला आहे, याशिवाय कालच्या दिवसभरात कोरोनामुळे 848 जणांंचा मृत्यु (Coronavirus Fatality) झाल्याने सध्या कोरोना बळींंची संख्या 58,390 इतकी झाली आहे. सविस्तर आकडेवारी पाहिल्यास, सध्या देशात 7,04,348 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत (COVID 19 Active Cases) ज्यांंच्यावर कोविड रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तसेच आजवर 24,04,585 जणांंनी कोरोना वर मात करुन डिस्चार्ज (Coronavirus Recovered Cases) मिळवला आहे. COVID 19 Vaccine: Covisheild या कोरोना लसीच्या उत्पादनाला परवानगी असली तरी विक्रीबाबत अद्याप निर्णय नाही- Serum Instititute
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब मंंत्रालयाच्या माहितीनुसार, आजवर देशात कोरोनाच्या एकुण 3 कोटी 50 लाख हुन अधिक चाचण्या झाल्या आहेत. देशात Test, Track, Treat हा नियम पाळत दिवसागणिक कोरोनाच्या चाचण्यांंची संख्या वाढवण्यात येत आहे.
ANI ट्विट
India's #COVID19 case tally crosses 31 lakh mark with 60,975 fresh cases and 848 deaths in the last 24 hours.
The #COVID19 case tally in the country rises to 31,67,324 including 7,04,348 active cases, 24,04,585 cured/discharged/migrated & 58,390 deaths: Ministry of Health pic.twitter.com/X0tb6dYInC
— ANI (@ANI) August 25, 2020
दरम्यान, भारतात कोविड-19 रुग्णांचा बरे होण्याचा दर जवळपास 75 % वर पोहोचला आहे.तर मृत्युदर या तुलनेत अगदी कमी आहे. काही दिवसांपुर्वी यावरुन केंद्रीय आरोग्यमंंत्री डॉ.हर्षवर्धन यांंनी सुद्धा देशात कोरोनाची परिस्थिती नियंंत्रणात असल्याचा दिलासा होता. दुसरी कडे, कोविशिल्ड, आयसीएमआर-भारत बायोटेकची 'कोवाक्सिन' आणि झायडस कॅडिलाची 'झीकोव्ह-डी' या लसी मानवी क्लिनिकल चाचण्यांच्या विविध टप्प्यात आहेत.