COVID 19 Vaccine: Covisheild या कोरोना लसीच्या उत्पादनाला परवानगी असली तरी विक्रीबाबत अद्याप निर्णय नाही- Serum Instititute
Coronavirus (Photo Credits: Pixabay)

COVID 19 Vaccine: युके मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ (Oxford University) आणि अ‍ॅस्ट्राझेनेका (Astrazeneka) बनवत असलेल्या लसीचे मॅन्युफॅक्चरिंग करणार्‍या सीरम इंस्टिट्युट (Serum Institute) तर्फे येत्या 73 दिवसात ‘कोविशिल्ड’ (Covishield) नावाची पहिली लस विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचे वृत्त आपण वाचले असेल मात्र यात थोडा बदल असुन त्या संदर्भात आता सीरम इंंस्टिट्युट कडुन स्पष्टीकरण देण्यात आले आहे. केंद्र सरकार तर्फे कोविशिल्ड या लसीच्या उत्पादनाला परवानगी देण्यात आली असली तरी हे उत्पादन विक्रीसाठी अद्याप उपलब्ध करण्याचा निर्णय झालेला नाही. सरकारने उत्पादन निर्मिती करुन राखुन ठेवायला सांंगितले आहे जेणेकरुन भविष्यात लसीच्या चाचण्या पुर्ण होताच वापर करणे सोप्पे होईल त्यामुळे 73 दिवसात लस बाजारात आणली जाणार या माहितीवर विश्वास ठेवु नये असेही सीरम तर्फे सांगण्यात आले आहे.

कोविशिल्ड बाबत सांगताना सीरम च्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, लसीच्या तिसर्‍या टप्प्यातील चाचण्या सुरु आहेत. या चाचण्यांंमध्ये जेव्हा पुर्णतः सकारात्मक रिझल्ट समोर येईल तेव्हाच ही लस बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केली जाईल.

ANI ट्विट

दरम्यान या माहितीसोबतच केंद्र सरकार सीरम इन्स्टिट्युट कडुन 68 कोटी लसी खरेदी करणार असल्याने भारतीयांंना या लसीचे डोस मोफत लावले जाणार आहेत. अशी ही माहिती यापुर्वी समोर आली होती यावर तरी सीरम कडुन काही पुष्टी झालेली नाही.

दरम्यान, कोविशिल्ड व्यतिरिक्त आयसीएमआर-भारत बायोटेकची 'कोवाक्सिन' आणि झायडस कॅडिलाची 'झीकोव्ह-डी' देखील प्रगती आहे. दोन्ही लस उमेदवार फेज -I आणि II मध्ये एकाच वेळी मानवी क्लिनिकल चाचण्यांमध्ये आहेत