COVID 19 Vaccine: कोरोनावरील लसीसाठी सुरु असणारी प्रतिक्षा आता अखेरीस संपणार आहे. युके मध्ये ऑक्सफर्ड विद्यापीठ (Oxford University) आणि अॅस्ट्राझेनेका (Astrazeneka) बनवत असलेल्या लसीचे मॅन्युफॅक्चरिंग करणार्या सीरम इंस्टिट्युट (Serum Institute) तर्फे येत्या 73 दिवसात ‘कोविशिल्ड’ (Covishield) नावाची पहिली लस विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. मुख्य म्हणजे केंद्र सरकार सीरम इन्स्टिट्युट कडुन 68 कोटी लसी खरेदी करणार असल्याने भारतीयांंना या लसीचे डोस मोफत लावले जाणार आहेत. सध्या या लसीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सिरम इन्स्टिट्यूटकडून सुरु आहे. Coronavirus in India: कोरोना बाधितांच्या संख्येत भारताने ओलांडला 30 लाखांचा टप्पा; 69,239 नव्या रुग्णांच्या मोठ्या भरीसह 912 जणांचा मृत्यू
सिरमच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “सरकारने ‘सिरम’ला लसीचा ‘विशेष उत्पादन प्राधान्य परवाना’ दिला आहे. चाचण्यांची प्रोटोकॉल प्रक्रिया 58 दिवसांत पूर्ण करण्यासाठी वेगाने काम होत आहे. पहिला डोस हा शनिवारी (22 ऑगस्ट) त्यानंतर दुसरा डोस हा 29 दिवसांनी तयार होईल. त्यानंतर पुढच्या 15 दिवसांत अंतिम चाचणी अहवाल सादर केला जाईल. त्यानंतर कोविशिल्ड लस बाजारात आणण्याच्या विचारात आहोत.”
दरम्यान, कोविशिल्ड व्यतिरिक्त आयसीएमआर-भारत बायोटेकची 'कोवाक्सिन' आणि झायडस कॅडिलाची 'झीकोव्ह-डी' देखील प्रगती आहे. दोन्ही लस उमेदवार फेज -I आणि II मध्ये एकाच वेळी मानवी क्लिनिकल चाचण्यांमध्ये आहेत.