Coronavirus Update: भारताने गाठला 57 लाख कोरोनाबाधितांंचा टप्पा, 24 तासात वाढले 86,508 रुग्ण; मृत, डिस्चार्ज, अ‍ॅक्टिव्ह रुग्णांंची आकडेवारी पहा
Coronavirus | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Coronavirus Update In India: भारताने मागील 24 तासातील कोरोनाबाधितांंच्या वाढीनुसार 57 लाखाचा टप्पा गाठला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Union Health Ministry) माहितीनुसार, गेल्या 24 तासांत देशात 86 हजार 508 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आहे ज्यानुसार देशातील एकुण कोरोना बाधितांची संख्या 57 लाख 32 हजार 519 इतकी झाली आहे. कालच्या दिवसभरात 1,129 जणांंचा कोरोनाने बळी घेतला असुन एकुण कोरोना मृतांंचा आकडा (Coronavirus Fatality)  91 हजार 149 झाली आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार, कोरोना मृतांंचा टक्का हा 1.59% इतका आहे. तर आजवर कोरोनावर मात केलेल्यांंची संख्या (Coronavirus Recovered)  46, 74, 988 इतकी झाली आहे. कोरोना रिकव्हरी रेट सुद्धा सध्या 81 टक्क्यांंच्या वर आहे. देशात 9,66,382 जणांवर उपचार (Coronavirus Active Cases) सुरु आहेत. Coronavirus Testing: कोविड-19 'Gargle and Spit' टेस्ट म्हणजे काय? जाणून घ्या चाचणीच्या या पद्धतीबद्दल सविस्तर

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार देशात आतापर्यंत 6 कोटी 74 लाख 36 हजार 31 करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यापैकी 11 लाख 56 हजार 569 चाचण्या तर अवघ्या 24 तासात घेतल्या गेल्या आहेत. COVID 19 Vaccine Update: Johnson & Johnson कंंपनी कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचणीच्या अंतिम टप्प्यात- डोनाल्ड ट्रंप

ANI ट्विट

दरम्यान, एकीकडे कोरोना रुग्णांंची संख्या वाढत असतानाच, मागील पाच दिवसात कोरोना रुग्णांंच्या वाढीहुन कोरोना रुग्णांंची रिकव्हरी अधिक प्रमाणार होत आहे. त्यातही 22 सप्टेंबर रोजी भारतात एकाच दिवसात 1 लाखाहुन अधिक कोरोना रुग्ण रिकव्हर झाले होते जो की आजवरचा सर्वात मोठा यशस्वी टप्पा आहे.