COVID 19 Vaccine Update: Johnson & Johnson कंंपनी कोरोना लसीच्या क्लिनिकल चाचणीच्या अंतिम टप्प्यात- डोनाल्ड ट्रंप
Donald Trump | (Photo Credits: Facebook)

कोरोना लसीच्या (Coronavirus Vaccine) संंदर्भात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप (Donald Trump)  यांंनी एक महत्वपुर्ण माहिती व्हाईट हाऊस मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. ट्रंप यांंच्या माहितीनुसार, अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) या कंंपनीची करोनावरील संभाव्य लस वैद्यकीय चाचणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. ही अमेरिकेतील चौथी लस आहे जी क्लिनिकल चाचणीच्या चौथ्या टप्प्यात आहे. या लसीच्या चाचण्यांंसाठी अमेरिकन नागरिकांंनी प्रतिनिधित्व करण्यासाठी नोंंदणी करावी असेही आवाहन ट्रंप यांंनी केले आहे. ही आपल्या देशासाठी महत्वाची आणि फायद्याची मदत ठरेल असे म्हणत ट्रंप यांंनी नागरिकांंना प्रोत्साहन दिले. COVID19 Health Update: आयोडिन सोल्यूशनमध्ये केवळ 15 सेकंदात नष्ट होतो कोरोना व्हायरस? जाणून घ्या संशोधकांचे मत

दुसरीकडे, अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणुकीवरुन सुरु असलेल्या राजकारणावरही त्यांंनी भाष्य केले आहे. विरोधी पक्षाचे राष्ट्राध्यक्ष पदाचे उमेदवार जो बिडेन यांंना टार्गेट करत“अमेरिकेत्या इतिहासात आर्थिक सुधारणांना सर्वात वेगानं आम्ही पुढे नेल्या आहेत. आमचा वैज्ञानिक दृष्टीकोन आहे. परंतु बिडेन हे विज्ञान विरोधी दृष्टीकोन असलेलेल व्यक्ती आहेत,” असंही ट्रम्प म्हणाले. काही दिवसांपुर्वी जो बिडेन यांनी ट्रंप यांंच्या चीन आणि युरोपच्या प्रवासावर बंदी आणि त्यावर आखण्यात आलेल्या धोरणांचा विरोध केला होता.

ANI ट्विट

दरम्यान काही दिवसांपुर्वी भारताचे आरोग्यमंंत्री डॉ, हर्षवर्धन यांंनी सांंगितल्यानुसार, जगभरात कोरोनावरील संभाव्य अशा 145 लसींंच्या चाचण्या सुरु आहेत. यापैकी 35 लसी या क्लिनिकल चाचण्यांंच्या टप्प्यात आहेत. भारतात सुद्धा 30 लसींंची चाचणी सुरु आहेत. यातील 3 लसी या क्लिनिकल चाचण्यांंच्या 1,2,3 अशा अ‍ॅड्व्हान्स टप्प्यात आहेत तर 4 लसी या प्री क्लिनिकलच्या अ‍ॅडव्हान्स टप्प्यात आहेत.