Coronavirus | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

जगावरील कोरोना व्हायरसचे (Coronavirus) आरोग्य संकट कायम असून दिवसेंदिवस ते दाहक रुप धारण करत आहे. दरम्यान, जगभरातील संशोधक त्यावर शोध करत आहेत. कोविड-19 (Covid-19) वरील लसी ही विकासाच्या विविध टप्प्यात आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या काही संशोधकांनी एक आश्चर्यकारक दावा केला आहे. आयोडिन सोल्यूशनने दररोज नाक किंवा तोंड साफ केल्यास कोरोना व्हायरसपासून विशेष नुकसान होणार नाही, असे या संशोधकांचे म्हणणे आहे.

0.5% कंस्ट्रशन युक्त आयोडिन सोल्यूशनचा कोरोना व्हायरसशी संबंध आल्यास 15 सेकंदात व्हायरस नष्ट होतो. गेल्या काही दिवसांपूर्वी युनिव्हर्सिटी ऑफ कनेक्टिकट स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांद्वारे केलेल्या शोधाचे परीणाम समोर आले. त्यानुसार एखाद्या व्यक्तीने आयोडिन सोल्यूशनने नाक किंवा तोंड नियमित साफ केल्यास कोरोना व्हायरसचा प्रभाव फक्त कमी होत नाही तर काही विशिष्ट परिस्थितीत हा व्हायरस नष्ट देखील होतो. (COVID19 Spreads Through Houseflies? माशांंमुळे पसरतो का कोरोना व्हायरस, WHO ने दिलं हे स्पष्टीकरण)

संशोधकांनी तीन वेगवेगळ्या कन्संट्रेट आयोडिन मध्ये (2.50%, 0.25% आणि 0.5%) कोरोना व्हायरसचे परीक्षण केले. या परीक्षणानंतर असे दिसून आले की, 0.5% कन्संट्रेशन आयोडिन सोल्यूशनमध्ये कोरोना व्हायरस पूर्णपणे निष्क्रिय होतो. विशेष म्हणजे हा व्हायरस केवळ 15 सेकंदात नष्ट होतो. अलिकडेच संशोधकांनी अल्कोहोलच्या मदतीनेही हा प्रयोग केला. मात्र त्याचे परीणाम फार आशादायी नव्हते.

या परीणामांनंतर आयोडिन सोल्यूशनचा वापर कीटाणूनाशक म्हणूनही करता येईल, असा सल्ला संशोधकांनी दिला आहे. तसंच या सोल्यूशनच्या ड्रॉप्स आणि एअरसोलच्या माध्यमातून कोरोना व्हायरसचा प्रसाराची जोखीम कमी होण्यास मदत होईल. या प्रयोगाने हॉस्पिटल्स, दवाखाने किंवा इतर क्षेत्रांमध्ये कोरोना व्हायरसचा फैलाव कमी होण्यास मदत होईल. त्याचबरोबर याद्वारे कोरोना व्हायरस संसर्गाच्या गंभीर लक्षणांचा धोका कमी करता येईल. त्यामुळे फुफ्फुसांवर पडणारा ताण कमी करता येईल.

कोरोना व्हायरस मनुष्याच्या नाकातील एसीई-2 (ACE-2)च्या माध्यमातून पेशीत प्रवेश करतात. त्यानंतर संसर्ग जलद गतीने वाढायला लागतो. हा व्हायरस फक्त नाक किंवा तोंडाद्वारे शरीरात प्रवेश करत नाही. तर शरीराच्या आतील भागांवरही हल्ला सुरु करतात. अशावेळी जर आयोडिन सोल्यूशनने नाक किंवा तोंड साफ केल्यास संसर्गापासून बहुतांश प्रमाणात बचाव होऊ शकतो. मात्र हा प्रयोग घरी करणे धोकादायक धरु शकते, अशा सूचना संशोधकांनी दिल्या आहेत. हा प्रयोग तज्ञांच्या निगराणीखाली करता येईल.