IPL 2020: आयपीएलच्या आजच्या सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबने सनरायझर्स हैदराबादला 12 धावांनी पराभूत केले.

पीसी थॉमस, केरळ कॉंग्रेस यांनी एनडीएमधून बाहेर पडायचा निर्णय घेतला आहे. याबाबत ते म्हणाले, 'एनडीएने वचन दिलेली कोणतीही जागा आम्हाला देण्यात आली नाही. आमच्याकडे एनडीए सोडण्याशिवाय पर्याय उरला नाही. उद्या अधिकृत घोषणा केली जाईल. कॉंग्रेस नेते रमेश चेन्निथाला यांनी यूडीएफमध्ये आमचे स्वागत केले आहे. आम्ही उद्या आपला निर्णय जाहीर करू.'

असाम रायफल्सचे महासंचालक लेफ्टनंट जनरल सुखदीप सांगवान यांनी भारतीय लष्कर प्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांना भेट दिली आहे. सध्याच्या ताणतणाव आणि भारत-म्यानमार सीमेवरील सुरक्षा परिस्थितीची माहिती दिली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. ट्विट-

  

दिवाळीच्या निमित्ताने नागरिकांमध्ये सकारत्मकता आणण्यासाठी दिल्ली येथील पॅसिफिक मॉलमध्ये चक्क राम मंदिराची कृती उभारली गेली आहे. ट्विट- 

 

दिल्ली येथे आज 4116 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर, 36 जणांचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 3 लाख 52 हजार 520 वर पोहचली आहे. एएनआयचे ट्विट- 

 

बिहार: जनता दल राष्ट्रवादीवादी पक्षाचे उमेदवार नारायण सिंह यांच्यावर  श्योहर जिल्ह्यातील हातसर गावात गोळीबार करण्यात आला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात आज 6,417 नवे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. तसेच 137 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय 10,004 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 16,38,961 इतकी झाली आहे. सध्या 1,40,194 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईमध्ये आज 1257 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले असून 898 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याशिवाय आज 50 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.

पंजाबमध्ये आज 485 नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

 

जम्मू-काश्मीरः पाकिस्तानने आज सायंकाळी साडेसहा वाजता पुंछ जिल्ह्यातील डेगवार सेक्टरमध्ये युद्धबंदीचे उल्लंघन केले. भारतीय सैन्य प्रत्युत्तर देत आहे.

Load More

कोरोना व्हायरस (Coronavirus) आणि त्यात आलेले लॉकडाऊन (Lockdown) यामुळे देशावर आलेले आर्थिक संकट खूपच मोठे आहे. त्याचा सामना करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. असे असताना त्याच्याशी दोन हात करण्यासाठी केंद्र सरकार देशात निरनिराळ्या योजना राबवत आहे. यामुळे बेरोजगारांना रोजगार मिळावा आणि स्वदेशीचा प्रसार हा त्यामागचा उद्देश आहे. याचाच एक भाग म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते गुजरातमध्ये किसान सूर्योदय योजनेसह अन्य तीन प्रकल्पांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (Video Conference) उद्घाटन करणार आहे. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी या योजना आणि त्यांची सविस्तर माहिती जनतेला देतील.

देशातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मेट्रो, मोनो रेल्वे सेवा सुरु होणे हा त्याचाच एक भाग आहे. त्याचबरोबर आता मंदिरेही हळूहळू खुली होताना दिसत आहे. मथुरेतील बांके बिहारी मंदिर उद्यापासून भाविकांसाठी खुले होणार आहे. मात्र त्यासाठी घालून देण्यात आलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसची परिस्थिती हळूहळू आटोक्यात येताना दिसत आहे. राज्यात काल 7347 नव्या रुग्णांची भर पडली असून आतापर्यंत एकूण 14,45,103 कोरोना संक्रमित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.