अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री माईक पोम्पीओ, रॉबर्ट सी ओब्रायन आणि जॉन आर बोल्टन यांच्यासह अमेरिकेच्या 28 व्यक्तींवर चीनने निर्बंध लादले. चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

अमेरिकाः जो बिडेन यांनी अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली, तसेच कमला हॅरिस यांनी अमेरिकेच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती पदाची शपथ घेतली.

 

पश्चिम बंगालः Furfura Sharif Ahale Sunnatul Jamat चे संस्थापक पीरजादा अब्बास सिद्दीकी उद्या स्वतंत्र राजकीय पक्षाची घोषणा करणार आहेत.

गीतकार जावेद अख्तर यांनी दाखल केलेल्या मानहानीप्रकरणी जुहू पोलिसांनी अभिनेत्री कंगना रनौतला समन्स बजावले आहे. 22 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहायला सांगितले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून निवडलेले जो बिडेन आणि त्यांची पत्नी जिल बिडेन आणि उपाध्यक्षपदी निवड झालेल्या कमला हॅरिस आणि त्यांचे पती डग एम्हॉफ अमेरिकन कॅपिटलमध्ये दाखल झाले आहेत.

मुंबईमध्ये आज कोरोना विषाणूच्या 501 रुग्णांची व 9 मृत्यूंची नोंद झाली आहे. आज शहरात 490  रुग्ण बरे झाले आहेत. एकूण संक्रमितांची संख्या 3,04,122 वर पोहोचली असून, 2,85,307 लोक बरे झाले आहेत व 11,266 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात 6,654 सक्रीय रुग्ण आहेत.

राज्यात आज 3015 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 4589 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1,8,99,428 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 46,769 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.07% झाले आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि फर्स्ट लेडी मिशेल US Capitol येथे पोहचले आहेत.

दिल्लीत कोरोनाचे आणखी 228 रुग्ण आढळले असून 10 जणांचा बळी गेला आहे.

Central Madrid मधील एका स्फोटात इमारत कोसळल्याच्या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती  देण्यात आली आहे.

Load More

मराठा आरक्षणाचा मुद्दा गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. यावरुन राज्यात राजकारण रंगले असून विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रीया देखील रखडल्या आहेत. दरम्यान, यावर आज 20 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. त्यामुळे आजच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या निकालानंतर मराठा समाजाचा आक्रमक पवित्रा निवळणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आज जो बायडन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची आणि कमला हॅरिल उपराष्ट्राध्यपदाची शपथ ग्रहण करतील. हा सोहळा अमेरिकेच्या कॅपिटलमध्ये रंगणार असून जो बायडन अमेरिकेचे 46 वे राष्ट्राध्यक्ष असतील. कोरोना संकटकाळात पार पडलेली ही सर्वात मोठी निवडणूक असून ती अनेक कारणांनी वेगळी ठरली. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचा पराभव न स्वीकारल्यामुळे आणि त्यांच्या आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टमुळे अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. मात्र 6 जानेवारी रोजी कॅपिटल इमारतीत झालेला हिंसाचाराने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर चहुबाजूने टीका झाली.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

शिखांचे 10 वे गुरु गुरु गोबिंद सिंह यांचे आज प्रकाश पुराण पर्व आहे. यानिमित्त भक्तांनी अमृतसरच्या सुवर्ण मंदिरात भक्तांनी प्रार्थना केली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या निमित्ताने देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत.