फेसबुक आणि इंस्टाग्राम यांची सेवा याक्षणी डाऊन; 17 सप्टेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
अण्णासाहेब चवरे
|
Sep 17, 2020 11:56 PM IST
कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय ठप्प झाले असताना महाराष्ट्र सरकारने बेरोजगार तरुणांना एक दिलासा दिला आहे. कोरोना संसर्गाच्या पारश्वभूमीवर कोणतीही सरकारी नोकर भरती बंद असताना राज्य सरकारने पोलिसांना मात्र या बंदीतून वगळले आहे. त्यामुळे राज्यत लवकरच तब्बल 12, 528 पदांसाठी मेगा पोलीस भरती होणारआहे. राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक नुकतीच पार पडली. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमूख यांनी हा निर्णय जाहीर केला आहे. विशेष बाब म्हणून पोलीस भरतीस राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
राज्यात आणखी एक विषय सध्या नाजूक ठरला आहे. तो म्हणजे मराठा आरक्षण. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणास स्थगिती दिली. त्यामुळे राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या भावना राज्य सरकारला माहिती आहे. राज्य सरकार मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या न्याय हक्कांपासून तसूभरही मागे हटणार नाही. तसेच, मराठा आरक्षणाला न्यायालयाने दिलेल्या स्थगितीवर पुढची दिशा काय ठरवायची याबाबत अंतिम निर्णय येत्या दोन दिवसांत घेतला जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मराठा समाज आरक्षण या विषयावर नुकतीच एक सर्वपक्षीय बैठकही पार पडली आहे.
देश आणि राज्यातील विविध प्रश्न अधिक गंभीर होऊन पुढे येत असताना कोरोना व्हायरस संकट अद्यापही कायम आहे. हे संकट केवळ कायमच नाही तर दिवसेंदिवस अधिक गंभीर रुप धारण करत आहे. राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमितांची एकूण संख्या 10 लाखाच्याही पुढे गेली आहे. तर, देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 50 लाखांच्या पुढे गेली आहे. सरासरी मृत्यूचे प्रमाण टक्केवारीत पाहिले तर ते कमी दिसते आहे. परंतू, एकूण आकडा अधिक वाटतो आहे, अशी स्थिती आहे.
दरम्यान, कोरोनाव व्हायरस, राजकारण, अर्थकारण, खेळ, उद्योग, कृषी, गुन्हे आणि यांसह विविध क्षेत्रातील ताज्या घटना घडामोडी तपशीलासह जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग सोबत जोडलेले राहा.