नाट्यपरिषद अध्यक्ष प्रसाद कांबळी यांच्यावर नियामक मंडळाच्या सभेत  अविश्वास ठराव मांडण्यात आला. त्यामुळे प्रसाद कांबळी यांना येत्या 15 दिवसांत बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. त्यासाठी विशेष नियामक सभा बोलवावी लागणार आहे.

व्याभिचारास (Adultery) गुन्ह्याच्या कक्षेतून बाहेर काढण्याबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court)  निर्णय सशस्त्र दलात (Armed Forces)  लागू होऊ नये यासाठी केंद्र सरकारने दाखल केलेल्या अर्जावर न्यायालायने बुधवारी (13 जानेवारी) नोटीस जारी केले. न्यायमूर्ती आरएफ नरिमन, न्यायमूर्ती नवीन सिन्हा आणि न्यायमूर्ती के एम जोसेफ यांच्या खंडपीठाने या अर्जावर दाखल मूळ जनहित याचिकार्ते आणि इतरांना नोटीस जारी केले. 

वाहनांच्या दोन्ही बाजूला आरसे नसतील तर वाहनचालक दंडास पात्र ठरणार आहेत. पुणे वाहतूक पोलिसांनी याबाबत ठोस भूमिका घेऊन कारवाईस सुरुवात केली आहे.

जळगाव जिल्ह्याच्या भुसावळ तालुक्यातील उर्ध्व तापी टप्पा -१ (हतनूर प्रकल्प) (५३६.०१ कोटी), शेळगाव बॅरेज मध्यम प्रकल्प (९६८.९७ कोटी) आणि वरणगाव तळवेल परिसर सिंचन योजना (८६१.११ कोटी) या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता.

मुंबई पोलिसांमुळे मायलेकरांची पुन्हा एकदा भेट झाली आहे. गितांजली राव यांचा हलवलेला मुलगा सापला आहे. या कामगिरीबद्दल राव यांनी मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत. आपल्या ट्विटर हँडलवरुन राव यांनी म्हटले आहे की, एपीआय पवनकुमार भोये, श्री उमेश शेलार आणि विमानतळ पोलिस स्टेशनच्या संपूर्ण टीमला माझ्याकडून आभार. माझा हरवलेला मुलगा या सर्वांमुळे सापडला त्याबद्दल लक्ष लक्ष आभार.

ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे एकेका मतांचा खेळ. त्यामुळे प्रत्येक मतदान महत्त्वाचं. असे असताना कोरोना व्हायरस संकटामुळे तर आणखीणच बिकट स्थिती. अशा स्थितीत तुम्ही जर कोरोना व्हायरस संक्रमित असाल तरी घाबरुन जायचं कारण नाही. तुम्हाला अटी आणि शर्थींचे पालन करत मतदान करता येणार आहे. राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी ही महत्त्वाची माहिती दिली आहे.

नारकॉटिक्स कन्ट्रोल ब्युरोने (एनसीबी) कारवाई करत समीर खान यांना अटक केली आहे. समीर खान हे राज्याचे कौशल्य विकास मंत्री नबाब मलिक यांचे जावई आहेत.

दोन मुलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भाजपच्या ब्लॉक स्तरीय पदाधिकाऱ्यास उत्तर प्रदेश पोलिसांनी अटक केले आहे. ही घटना जालौन य़ेथे घडली.

संघाचे प्रमुख मोहन भागवत हे दोन दिवसांच्या तामिळनाडूच्या दौर्‍यावर आहेत. ते 14 जानेवारी 2021 रोजी चेन्नईच्या मूलकडाईजवळील सामुदायिक पोंगल समारंभात भाग घेतील.

महागाई लक्षात घेऊन बालगृहे, निरीक्षण गृहे, खुली निवारागृहे आणि विशेष दत्तक संस्था यामधील प्रत्येक बालकांसाठी प्रतिमहा २ हजार रुपये याप्रमाणे लागू असणाऱ्या परिपोषण अनुदानाच्या दरात वार्षिक 8 टक्के वाढ करण्यास व ती 2021-22 या आर्थिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतला गेला.

Load More

कोरोना व्हायरस विरुद्धच्या लढाईत आपण आता एक महत्त्वपूर्ण टप्प्यावर पोहचलो आहोत. देशभरात लवकरच लसीकरणाला सुरुवात होईल. त्यासाठी लसीचे वितरण सुरु झाले आहे. काल सीरम इंस्टीट्यूटच्या कोविशिल्ड लसीचे देशातील 13 ठिकाणी वितरण करण्यात आले. आज ही लस मुंबईत दाखल झाली आहे. आज पहाटे बीएमसीच्या विशेष वाहनातून ही लस पुण्याहून मुंबईत आणण्यात आली.

दरम्यान. राज्यासाठी 9.63 लाख डोस उपलब्ध झाले आहेत. काल आरोग्य विभागाकडून पुण्यात हे डोसेस देण्यात आले आणि तेथून हे लसींचे डोसेस विविध शहरं/जिल्ह्यांत वितरीत करण्यात येणार आहेत. अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

आज देशभरात भोगीचा सण साजरा केला जात आहे. भोगी निमित्त साजऱ्या केल्या जाणाऱ्या उत्सवात आंध्र प्रदेश मधील टीडीपीचे प्रमुख एन चंद्रबाबू नायडू यांनी उपस्थित लोकांसमवेत राज्य सरकारच्या शेतकऱ्यांवरील शासकीय आदेशांना आग लावली.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान, सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपानंतर राज्यात राजकीय गदारोळ सुरु आहे. भाजपकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरु लागली आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले आहे. तसंच त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. मात्र मुंडे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.