सध्या भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात अनेक लहान मुलांचा जिव गेल्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसापुर्वीच हैदराबाद मध्ये तीन वर्षाच्या मुलाचा भटक्या कुत्र्याच्या हल्यात मृत्यू झाला होता. केरळमध्ये अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. केरळमधील कन्नूरजवळील मुझप्पिलंगगड येथे रविवारी संध्याकाळी घराबाहेर भटक्या कुत्र्यांच्या टोळीने हल्ला केल्याने 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. निहाल असे या मुलाचे नाव असून तो केटीनकम येथील रहिवासी होता. तो त्याच्या घरापासून सुमारे 300 मीटर अंतरावर गंभीर जखमी अवस्थेत आढळला.
जखमी अवस्थेत आढळल्यानंतर निहालला लवकरच उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांना त्याला वाचवण्यात अपयश आले असल्याचे पोलीसांनी सांगितले. ऑटिझम झालेला मुलगा सायंकाळी 5 वाजल्यापासून बेपत्ता होता आणि नातेवाईक, स्थानिक आणि पोलिसांचा समावेश असलेली शोध पथक परिसरात त्याचा शोध घेत होती. रात्री साडेआठच्या सुमारास तो गंभीर जखमी अवस्थेत त्याच्या घराजवळ आढळून आला. त्याला रुग्णालयात दाखल केले, जिथे त्याचा मृत्यू झाला.
या मुलाच्या मृत्यूचे कारण हे रस्त्यावरील कुत्र्यांनी हल्ला हे सांगण्यात आले. ऑटिझमचा शिकार असलेला हा मुलगा जास्त प्रतिकार करु शकला नसेल असे देखील सांगण्यात आले,