मुंबई: चेंबूर भागात आज 11 कावळे सापडले मृत अवस्थेत ; 10 जानेवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Prashant Joshi
|
Jan 10, 2021 11:37 PM IST
भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यूबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या प्रकरणी भंडारा जिल्हा रुग्णालयाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज करणार पाहणी करणार आहेत.
भारतामध्ये 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरु होत आहे. या कार्यक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लास देण्यात येणार आहे. सर्वप्रथम आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कर्मचारी यांना लस दिली जाईल. त्यानंतर 50 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती, तसेच बहुव्याधी असलेल्या 50 वर्षांखालील व्यक्ती यांना लसीकरणात प्राधान्य दिले जाईल.
कृषी कायद्याविरोधात शेतकर्यांचे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, कॉंग्रेसने जाहीर केले आहे की 15 जानेवारी रोजी देशभरात 'शेतकरी हक्क दिन' (Kisan Adhikar Divas) साजरा केला जाईल आणि या दिवशी राजभवनाला घेराव घातला जाईल. कॉंग्रेसने असा आरोप केला की, भारतातील हे असे पहिले सरकार आहे, जे शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यास सांगत आहेत.
दरम्यान, राजकारण, अर्थकारण, सामाजकारण, संस्कृती, कृषी आरोग्य, संशोधन, उद्योग यांसह जगभरातील घटना, घडामोडींचा ताजा तपशील जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी लाईव्ह ब्लॉग पाहात राहा. लेटेस्टली सोबत जोडलेले राहा.