
New Fastag Rules: नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) फास्टॅग बॅलन्स व्हेरिफिकेशनसाठी नवे नियम जाहीर केले आहेत. 17 फेब्रुवारी 2025 पासून म्हणजेच आजपासून हे नियम लागू होणार आहेत. नॅशनल पेमेंटकॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) फास्टॅग बॅलन्स व्हेरिफिकेशनसाठी नवे नियम 28 जानेवारी 2025 रोजी एका परिपत्रकात जारी केले होते. एनपीसीआयच्या परिपत्रकानुसार, टोल व्यवहार अधिक सुरळीत आणि पारदर्शक करण्यासाठी तसेच फसवणूक रोखण्यासाठी एनपीसीआय हे नियम आणत आहे. अशा वेळी वाहनधारकांना या बदलांची संपूर्ण माहिती असावी, जेणेकरून त्यांना कोणतीही गैरसोय किंवा दंड टाळता येईल. फास्टॅग खाती दोन श्रेणींमध्ये विभागली गेली आहेत: व्हाइट लिस्टेड (सक्रिय) आणि ब्लॅकलिस्टेड (निष्क्रिय). फास्टॅगला ब्लॅकलिस्टेड यादीत टाकण्याची अनेक कारणे असू शकतात, जाणून घेऊया काय आहे, संपूर्ण माहिती
येथे पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
फास्टॅगच्या नवीन नियमाबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.
1] वाहन टोल प्लाझावरून पास होण्याच्या आधी 60 मिनिटांपर्यंत फास्टॅगमध्ये पुरेशी रक्कम नसेल किंवा कार्ड निष्क्रिय झाला असेल आणि पास झाल्यानंतर 10 मिनिटांपर्यंत कार्ड निष्क्रिय राहिला असेल तर व्यवहार नाकारला जाईल.
2] फास्टॅग ब्लॅक लिस्ट यादीत टाकला गेला असेल किंवा 60 मिनिटांपूर्वी कमी बॅलन्समुळे निष्क्रिय झाला असेल आणि ही स्थिती 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ कायम राहिली असेल तर टोल प्लाझावर पोहोचल्यावर व्यवहार अयशस्वी होईल.
3] वाहन चालकाने केवायसी पडताळणी पूर्ण केली नसेल तरी त्याच्या खात्यात पुरेशी रक्कम असतानाही तुमचे कार्ड ब्लॅक लिस्ट होऊ शकते.
4] टोल प्लाझावर पोहोचण्याच्या ६० मिनिटे आधी फास्टॅग ब्लॅक लिस्ट झाल्यास वाहन धारकाने लगेच रिचार्ज केला तरी तो व्यवहार नाकारला जाईल.
वाहनधारकांना खाली दिलेल्या बाबी तपासाव्या
1] फास्टॅग खात्यातील रक्कम
2]वाहन नोंदणीच्या तपशिलात बदल
3] केवायसी पडताळणी
टोल स्कॅनिंगनंतर १० मिनिटांच्या आत फास्टॅग रिचार्ज केल्यास वाहन धारक दंड टाळू शकतो आणि त्याला फक्त स्टँडर्ड टोल फी भरावी लागेल. जर कोणताही फास्टॅग अटींची पूर्तता करत नसेल तर सिस्टम एरर कोड 176 सह व्यवहार नाकारेल आणि वाहन मालकाला दुप्पट टोल शुल्क भरावे लागेल.