PM narendra Modi (फोटो सौजन्य - ANI)

Longest Serving PM: 25 जुलै 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडत स्वातंत्र्योत्तर भारताचे दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक काळ पंतप्रधान होण्याचा मान पटकावला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 16 वर्षे 286 दिवस पंतप्रधानपद भूषवले होते, जे अद्यापही सर्वाधिक आहे. पंतप्रधान मोदी यांनी 24 मार्च 1977 पर्यंत 4077 दिवस सलग पंतप्रधान राहिलेल्या इंदिरा गांधी यांचा विक्रम मोडून 4078 दिवसांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे.

राजकीय इतिहासात अभूतपूर्व उदाहरण

गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून तीन वेळा विजयी होणारे आणि नंतर देशाच्या पंतप्रधानपदी तीन वेळा यशस्वी होणारे नरेंद्र मोदी हे एकमेव नेते ठरले आहेत. त्यामुळे ते राज्य आणि केंद्र या दोन्ही पातळ्यांवर सलग सहा निवडणुका जिंकणारे एकमेव नेते आहेत. हा विक्रम केवळ व्यक्तिगत यश नसून भारतीय राजकारणात एक मोठा बदल दर्शवतो. नरेंद्र मोदी हे केवळ एक पंतप्रधान नाहीत, तर राजकीय सातत्य, कार्यक्षम नेतृत्व आणि जनतेच्या पाठिंब्याचे सशक्त प्रतीक ठरले आहेत. (हेही वाचा - OBC Reservation Vacant Posts: केंद्रीय विद्यापीठांमध्ये ओबीसी, एससी, एसटी प्रवर्गातील प्राध्यापकांच्या 80% जागा रिक्त – राहुल गांधींचा आरोप)

मोदींचे ऐतिहासिक विक्रम:

  • स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले पंतप्रधान
  • सर्वात जास्त काळ पंतप्रधान राहिलेले पहिले बिगर-काँग्रेसी नेते
  • सतत दोन पूर्ण कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर-काँग्रेसी पंतप्रधान
  • लोकसभेत दोन वेळा पूर्ण बहुमत मिळवून सरकार स्थापन करणारे पहिले बिगर-काँग्रेसी नेते
  • पार्टीचे नेतृत्व करत सलग तीन सार्वत्रिक निवडणुका जिंकणारे (2014, 2019, 2024) दुसरे पंतप्रधान (नेहरूंनंतर)
  • मुख्यमंत्री आणि पंतप्रधानपद मिळून सलग 24 वर्षे सरकारचे नेतृत्व

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचे सर्वाधिक प्रभावशाली आणि चर्चिले जाणारे राजकारणी नेते मानले जातात. त्यांनी केवळ देशाच्या राजकीय इतिहासात नव्हे, तर जागतिक स्तरावरही आपली वेगळी छाप निर्माण केली आहे.