Anand Mahindra On 90-Hour Work Week: महिंद्रा ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी शनिवारी कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज व्यक्त केली. कामाच्या प्रमाणात नाही तर त्याच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करा, कारण 10 तासांत जग बदलू शकते. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आयोजित राष्ट्रीय युवा महोत्सवादरम्यान त्यांनी हे विधान केले. यावेळी त्यांना लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) चे अध्यक्ष एस. एन. सुब्रमण्यम (SN Subrahmanyan) यांच्या आठवड्यातून 90 तास काम (90-Hour Work Week) करण्याबाबतच्या त्यांच्या विधानाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की, 'माझी पत्नी खूप सुंदर आहे, तिला पाहत राहणं छान वाटतं.'
कामाची गुणवत्ता सर्वात महत्वाची -
एस. एन. सुब्रमण्यम यांनी काही दिवसांपूर्वी टिप्पणी केली होती की, कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 90 तास काम करावे आणि रविवारीही सुट्टी घेऊ नये. या टिप्पणीमुळे सोशल मीडियावर वाद निर्माण झाला. सुब्रमण्य म्हणाले की, तुम्ही किती वेळ तुमच्या बायकोकडे बघू शकता? या टिप्पणीशी अनेकांनी असहमती दर्शविली. तथापि, आनंद महिंद्रा यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मी म्हणतो की आपण कामाच्या प्रमाणात नाही तर कामाच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तुम्ही 40 तास काम करा, 70 तास किंवा 90 तास. तुम्ही 10 तासांत जग बदलू शकता. काम सर्वात महत्वाचे आहे. (हेही वाचा - Anand Mahindra Response to Criticism: महिंद्रा कार्सवर तिखट टीका, आनंद महिंद्रा यांचे प्रत्युत्तर; सोशल मीडियात चर्चा)
कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यावर भर -
आनंद महिंद्रा यांनी एक उदाहरण दित सांगितले की, अभियंते आणि एमबीए सारखी पार्श्वभूमी असलेल्या लोकांनी कला आणि संस्कृतीचा अभ्यास केला पाहिजे जेणेकरून ते चांगले निर्णय घेऊ शकतील. कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्याची गरज अधोरेखित करताना महिंद्रा म्हणाले, जर तुम्ही घरी वेळ घालवत नसाल, मित्रांसोबत वेळ घालवत नसाल, जर तुम्ही वाचन करत नसाल, जर तुम्हाला चिंतन करण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर तुम्ही निर्णय घेताना योग्य इनपूट कसे आणाल? (हेही वाचा, Anand Mahindra Shares Mosquito-Killing Device: डास मारण्याची ही तोफ कोठे शोधायची? आनंद महिंद्रा यांनी सोशल मीडिया शेअर केले खास उपकरण)
लोकांना काय खरेदी करायचे आहे हे आपल्याला कसे समजेल?
आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ऑटोमेकर महिंद्रा अँड महिंद्राचे उदाहरण देताना सांगितले की, ग्राहकाला कारमध्ये काय हवे आहे हे आपल्याला ठरवावे लागेल. जर आपण आपल्या कुटुंबासह नसून सतत ऑफिसमध्ये असलो तर आपण इतर खरेदी करू शकणार नाही. जेव्हा आपण आपल्या कुटुंबासोबत नसतो तेव्हा लोकांना काय खरेदी करायचे आहे हे आपल्याला कसे समजेल? त्यांना कोणत्या प्रकारची कार घ्यायची आहे हे कसे समजेल? असा सवालही यावेळी आनंद महिंद्रा यांनी उपस्थित केला.