उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) जालौना (Jalaun) जिल्ह्यातील राजेंद्र नगर (Rajendra Nagar) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. या परिसरातील एका शिक्षकाची हत्या (Teacher Murder) करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी (24 सप्टेंबर) घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांनीच शिक्षकाची हत्या केल्याची पोलिसांना संशय आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काहीजण शिक्षकांच्या घरी आले आणि त्यांचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर शिक्षक बाहेर येताच त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला करण्यात आला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
नरवाडा (वय, 65) असे हत्या झालेल्या शिक्षकाचे नाव आहे. नरवाडा हे गणिताचा कोचिंग क्लास चालवायचे. दरम्यान, शुक्रवारी नरवाडा यांच्या घरी काहीजण आले आणि त्यांच्या घराचा दरवाजा ठोठावला. त्यानंतर नरवाडा यांनी दरवाजा उघडताच आरोपींनी त्यांच्यावर रोखंडी रॉडने हल्ला केला. ज्यात गंभीर जखमी झालेल्या नरवाडा यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. हल्लेखोरांची ओळख पटलेले नसून याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहे. हे देखील वाचा- Uttar Pradesh Crime: यूपीमध्ये अनोखळी व्यक्तीशी बोलल्याबद्दल 35 वर्षीय महिलेला सासरच्या लोकांकडून झाडाला बांधून मारहाण
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेचा आवाज ऐकताच शिक्षकांचे नातेवाईक हॉलमध्ये धावून आले. त्यानंतर नरवाडा यांना जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले. महत्वाचे म्हणजे, या हल्ल्यात कोचिंग क्लासच्या विद्यार्थ्यांचा हात असू शकतो, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची चार पथके नेमण्यात आली आहेत.