Kota Student Suicide: आयआयटी जेई (JEE Exam) ची तयारी करणाऱ्या आणखी एका विद्यार्थिनीने राजस्थान (Rajasthan)मधील कोटा (Kota) येथे आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीची जेईई मेनची परीक्षा दोन दिवसांनी होती. विद्यार्थिनीच्या खोलीतून एक सुसाईड नोटही सापडली असून त्यात तिने परीक्षेच्या दबावाचा उल्लेख केला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी विद्यार्थिनीने सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे की, 'आई आणि बाबा, मी जेईई करू शकत नाही, म्हणूनच मी आत्महत्या करत आहे. मी सर्वात वाईट मुलगी आहे, माफ करा आई आणि बाबा, हा शेवटचा पर्याय आहे.'
प्राप्त माहितीनुसार, कोटा येथील कोचिंग क्लासमध्ये जेईई मेनची तयारी करणाऱ्या 18 वर्षीय विद्यार्थिनीने तिच्याच घरातील खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. 31 जानेवारीला विद्यार्थिनीची परीक्षा होती. मिळालेल्या माहितीनुसार, कोचिंग कोर्स पूर्ण केल्यानंतर ती घरूनच परीक्षेची तयारी करत होती. (हेही वाचा -Maharashtra Suicide Cases: देशात 2022 मध्ये महाराष्ट्रात झाल्या सर्वाधिक आत्महत्या; रोजंदारीवर काम करणारे सर्वात असुरक्षित: NCRB Data)
गेल्या आठवड्यात NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या -
आठवड्याभरापूर्वीच कोटामध्ये NEET ची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास लावून आत्महत्या केली होती. विद्यार्थ्याचे वय 17 ते 18 वर्षे होते. मृत विद्यार्थी यूपीच्या मुरादाबाद जिल्ह्यातील रहिवासी होता.
गेल्या वर्षी 30 विद्यार्थ्यांनी संपवल जीवन -
कोटामध्ये गेल्या वर्षी (2023) परीक्षेच्या दबावामुळे 30 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली होती. या वर्षात आत्महत्येची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी 24 जानेवारी 2024 रोजी NEET विद्यार्थ्याने परीक्षेच्या भीतीने आत्महत्या केली होती. (हेही वाचा - Mumbai Suicide News: बॅंकेत नोकरी करणाऱ्या महिलेची आत्महत्या; सासरे, नवऱ्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल, मुंबईतील घटना)
कोटा येथील विद्यार्थ्यांच्या सततच्या आत्महत्येनंतर शिक्षण मंत्रालयाने नुकतीच कोचिंग संस्थांसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती. या मार्गदर्शक तत्त्वात 16 वर्षांखालील विद्यार्थ्यांना कोचिंग इन्स्टिट्यूटमध्ये दाखल करू नये आणि चांगले गुण किंवा रँक मिळण्याची हमी अशी दिशाभूल करणारी आश्वासने देऊ नयेत, अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या.