![](https://mrst1.latestly.com/uploads/images/2025/02/1-491756336-380x214.avif?width=380&height=214)
Milkipur Bypoll Election Results: मिल्कीपूर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला असून भाजपचे चंद्रभान पासवान यांनी समाजवादी पक्षाचे अजित प्रसाद यांचा 60 हजार मतांनी पराभव केला आहे. फैजाबादलोकसभा निवडणुकीत सपाचे अवधेश प्रसाद यांच्याकडून झालेल्या पराभवाचा बदला घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याने मिल्कीपूरमध्ये आज चढाओढ वाढली होती. अयोध्येतील मिल्कीपूर पोटनिवडणुकीचे समोर आले आहेत. दरम्यान, आठ महिन्यांपूर्वी फैजाबादच्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भाजपला सावरण्याची महत्त्वपूर्ण संधी मिळाली आहे. समाजवादी पक्षासाठी ही पोटनिवडणूक या भागावर आपली पकड मजबूत करण्याची संधी होती. मिल्कीपूर पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रभान पासवान यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार अजित प्रसाद यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. निकालाची ताजी आकडेवारी पाहिल्यास भाजपाला 126,172 सपाला 69,156 वोट आल्याचे समोर आले आहे. हेही वाचा: Delhi Result 2025 Updates: 27 वर्षांनंतर राजधानीत पुन्हा भाजपची सत्ता, आम आदमी पक्षाला मोठा धक्का
पासवान यांनी 70 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवत या जागेवर भाजपची पकड आणखी मजबूत केली आहे. विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला. ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई खाऊ घालून आनंद व्यक्त केला. दरम्यान, हा पराभव समाजवादी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजप नेत्यांनी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या धोरणांचा विजय असल्याचे म्हटले आहे. अयोध्येतील मिल्कीपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या कलांमध्ये भाजपचे उमेदवार चंद्रभान पासवान यांनी लक्षणीय आघाडी घेतली आहे. 29 व्या फेरीच्या मतमोजणीनंतर पासवान 60,936 मतांनी आघाडीवर आहेत.
विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत आहे. ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष करण्यात आला आणि कार्यकर्त्यांनी एकमेकांना मिठाई खाऊ घालून आपला आनंद व्यक्त केला. दरम्यान, हा पराभव समाजवादी पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. भाजप नेत्यांनी हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या धोरणांचा विजय असल्याचे म्हटले आहे.
मिल्कीपूर येथील मतदारसंघातून २०२२ ची निवडणूक लढवत भाजपचे बाबा गोरखनाथ यांनी रिट याचिका दाखल केल्यानंतर पोटनिवडणुकीची घोषणा लांबणीवर पडली होती. प्रसाद यांच्या उमेदवारी अर्जांच्या सत्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी प्रसाद यांच्या विजयाला आव्हान केले होते. गोरखनाथ यांनी याचिका मागे घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने पोटनिवडणुकीची तारीख ५ फेब्रुवारी जाहीर केली.