RJD leader Lalu Prasad Yadav | File Image (Photo Credit: PTI)

चारा घोटाळा प्रकरणात बिहार (Bihar) चे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल (RJD) चेअध्यक्ष लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना झारखंड हाय कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. आज, शुक्रवारी झारखंड उच्च न्यायालयाने चारा घोटाळा (Fodder Scam) च्या देवघर कोषागार प्रकऱणात लालू प्रसाद यादव यांचा जमीन मंजूर केला आहे. 13 जून रोजी लालू प्रसाद यादव यांनी झारखंड उच्च न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला होता. सध्या जरी यादव यांना जमीन मंजूर झाला असला तरी लालू प्रसाद यांना तुरुंगातच राहावे लागणार आहे.

यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने यावर्षी एप्रिल महिन्यात लालू प्रसाद यादव यांची जमीन याचिका रद्द केली होती. चारा घोटाळा प्रकरणात अपराधी लालू प्रसाद यादव यांना 14 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली गेली. त्यांना सध्या रांची येथील राजेंद्र इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (RIMS) येथे उपचारांसाठी भरती केले गेले आहे. चाराघोटाळा प्रकरणी 5 जुलै रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी जमीन अर्जाच्या सुनावणीसाठी 12 जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली होती. (हेही वाचा: लालू प्रसाद यांना विष देऊन मारण्याचा भाजप सरकारचा डाव; राबडी देवी यांचा आरोप)

देवघर कोषागार प्रकऱणात शिक्षेचा अर्ध्याहून अधिक अवधी पूर्ण झाल्याचा आधार घेऊन लालूप्रसाद यादव यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या प्रकऱणात जमीन मिळाल्यानंतरदेखील लालू प्रसाद यादव यांची तुरुंगातून सुटका होणार नाही, कारण चाईबासा आणि दुमका कोषागार प्रकरणात त्यांना जमीन मिळाला नाही, याबाबत त्यांना शिक्षा झाली आहे.