Former Bihar Chief Minister Rabri Devi. (Photo Credits: IANS)

चार घोटाळा प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री, व राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) सध्या तुरुंगात आहेत. मात्र सलग दुसऱ्यांदा त्यांना भेटायला गेलेल्या तेजस्वी यादव यांना अडवले गेले व ही भेट घडू दिली नाही. यामुळे राबडी देवी (Rabri Devi) चांगल्याच संतापल्या आहेत. त्यांनी भाजप सरकारचा लालूंना रुग्णालयात विष देऊन जीवे मारण्याचा डाव असल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी काल ट्वीट केले आहे, ज्यामध्ये लालूंवर हुकुमशाही सुरू असल्याचे त्या म्हणत आहेत.

चारा घोटाळ्यात शिक्षा झालेले लालू रांची इन्सिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (रिम्स) मध्ये उपचार घेत आहेत. एप्रिलमध्ये तेजस्वी यादव त्यांना भेटायला गेले होते, त्यावेळी त्यांना भेटू दिले नव्हते. आताही परत एकदा ही भेट नाकारली गेली. यामुळे त्यांच्या पत्नी राबडी देवी अतिशय संतापल्या आहेत. ‘भाजप सरकारचा लालूंना विष देऊन मारण्याचा डाव आहे. त्यांना मुद्दाम कुटुंबाला भेटू दिले जात नाही. त्यांच्यावर हुकुमशाही चालू आहे, मात्र यामुळे बिहारची जनता रस्त्यावर उतरली तर याचे वाईट परिणाम होतील’, अशा आशयाचे ट्वीट त्यांनी केले आहे. (हेही वाचा: लालू राबडी मोर्चा पार्टी: बिहारच्या राजकारणात 'तेज प्रताप' यादव यांचे नवे पाऊल)

दरम्यान, लालूप्रसाद हे सध्या चारा घोटाळ्याप्रकरणी शिक्षेत आहेत. लालू यांनी प्रकृतीचे कारण देत सुप्रीम कोर्टात जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र कोर्टाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. आता मुद्दाम त्यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटू दिले जात नसल्याचे राबडी देवी म्हणत आहेत.