West Bengal By-Elections Results 2019: महाराष्ट्रनंतर भाजप पक्षाला पश्चिम बंगालमध्येही धक्का; कलियागंज येथे विजय मिळवल्यानंतर इतर 2 मतदारसंघातही तृणामूल काँग्रेस अघाडीवर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अधिक जागा मिळवूनही भाजपला राज्यात सत्ता स्थापन करण्यास अपयश आले. पश्चिम बंगाल (West Bengal) मध्ये पार पडलेल्या पोटनिवडुकीत (West Bengal By-Elections) तृणमूल काँग्रेसने (TMC) कलियागंज (Kaliyaganj) मतदारसंघात विजय मिळवल्यानंतर खडकपूर (Kharagpur) आणि करीमपूर (Karimpur) मतदारसंघातही भाजपला (BJP) धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कलियांगज यथील पोटनिवडणूकीत तृणामूल काँग्रेस पक्षाचे उमेदवार देब सिंह यांचा विजय झाला असून खडकपूर आणि करीमपूर मतदारसंघात टीएमसी आघाडीवर आहे. जर खडकपूर आणि करीमपूर मतदारसंघात तृणमूल काँग्रेसने विजय मिळवला तर, महाराष्ट्रनंतर भाजपसाठी सर्वात मोठा धक्का असेल.

पश्चिम बंगालमध्ये 25 नोव्हेंबर रोजी कलियागंज, खडकपूर आणि करीमपूर मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडली. त्यानंतर आज गुरुवारी 28 नोव्हेंबर सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, कलियागंज येथील पोटनिवडणुकीचा निकाल लागला असून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार देव सिंह यांनी विजय मिळवला आहे. तसेच खडकपूर आणि करीमपूर या दोन्ही मतदारसंघातही तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपने अधिक जागा जिंकूनही त्यांना महाराष्ट्रात सत्ता स्थापन करता आली नाही. यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांची नामुष्की केली जात आहे. यातच पश्चिम बंगालमध्ये तृणामूल काँग्रेस आपले वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करुन भाजपला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे.

एएनआयचे ट्वीट-