
राकेश महतो असे मृत मुलाचे नाव आहे. तसेच शुक्रवारी दुपारच्या वेळेस मित्रांसोबत राकेश हा अंघोळ करण्यासाठी नदीवर गेला होता. काही वेळानंतर त्याचे मित्र घरी परतले. मात्र राकेश त्यांच्या सोबत घरी आला नसल्याचे त्याच्या आईच्या लक्षात आले. त्यावेळी राकेशच्या आईने त्याच्या मित्रांना त्याच्याबद्दल विचारले असता त्यांना राकेश आपल्या सोबत घरी परतल्याचे लक्षात आले. या घटनेनंतर गावातील मंडळींनी राकेशला शोधण्यास सुरुवात केली. तसेच राकेश नदीवर गेला असल्याने तेथे ही त्यांनी पाहिले. त्यावेळी गावातील मंडळींना त्याचे मृत शरीर नदीच्या काठावर येऊन पडले असल्याचे दिसले. त्याचवेळी गावातील लोकांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.