Nirmala Sitharaman (Photo Credit: PTI/File)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) यंदा 5 जुलै 2019 ला 2019-20 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प मांडणार आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये सरकारने आगामी निवडणूक लक्षात घेता पीयुष गोयल (Piyush Goel) यांनी अंतरिम बजेट सादर केलं होतं. सामान्यांपासून उद्योग जगतातील भारतीयांना या बजेटमधून अनेक अपेक्षा आहेत. टॅक्स कमी व्हावा ही सामान्यांची अपेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पातही आहे. मध्यमवर्गाला मोदी सरकारकडून गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. तर टॅक्स एक्सपर्ट मात्र अर्थव्यवस्था मजबूत आणि गतिमान करण्यासाठी काही मोठी पावलं उचलू शकतात असे संकेत देत आहेत.

इनकम टॅक्समध्ये सूट

अंतरिम बजेटमध्ये सामान्यांना 5 लाख रूपयांपर्यंत टॅक्समध्ये सूट देण्यात आली आहे. त्यामुळे ही मर्यादा अजून वाढण्याची शक्यता कमी आहे. मात्र सामान्य इन्कम टॅक्स सूट (Tax Exemption Limit )साठी असलेली 2.5 लाखांची मर्यादा वाढवून 3 लाख करावी असे अनेकांना वाटत आहे.

गृह कर्ज

सध्या रिअल इस्टेट क्षेत्रात मंदी आहे. आर्थिक संकटात असलेल्या या क्षेत्राला पुन्हा चालना देण्यासाठी प्रयत्न केले जाऊ शकतात. गृह कर्ज दर कमी व्हावेत अशी सामान्यांची अपेक्षा आहे. तसेच आयाकरातही त्यापासून मिळाणारे फायदे वाढवले जावेत अशी सामन्यांची अपेक्षा आहे.

आरोग्य क्षेत्राला चालना

मोदी सरकारच्या पूर्ण अर्थसंकल्पामध्ये टॅक्स वाचवण्यासाठी अधिक पर्याय खुले केले जाऊ शकतात.

टॅक्स फ्री बॉन्ड

Infrastructure Projects ला चालना देणं हे यंदा सराकारचं लक्ष्य असल्याने सादर होणार्‍या आगामी बजेटमध्ये टॅक्स फ्री बॉन्ड्स पुन्हा येण्याची शक्यता आहे. अशाप्रकारच्या बॉन्ड्सवर टॅक्स नसेल. त्यांचा मॅच्युरिटी कालावधी हा 10 वर्ष किंवा त्याहून अधिक असू शकतो.

भाजपा सरकार पुन्हा पाच वर्षांसाठी सत्तेमध्ये आलं आहे. या स्थिर सरकारकडून जनतेला मोठ्या आशा - अपेक्षा आहेत.