Dhanteras 2020 (Photo Credits: File Image)

Sovereign Gold Bond Scheme Date, Issue Price: भारतामध्ये ग्राहकांची फिजिकल गोल्ड खरेदीची मागणी करून त्याला गुंतवणूकीचा पर्याय म्हणून पाहण्यासाठी सरकारने सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड स्कीम (Sovereign Gold Bond Scheme) सुरू केल्या आहे. आज (9 नोव्हेंबर) पासून त्याच्या 8व्या सीरीजला सुरूवात होत आहे. या आठवड्यात धनतेरस (Dhanteras) आणि दिवाळी (Diwali) सारखे दोन मोठे सण आहेत. या सणाच्या पार्श्वभूमीवर सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. त्याअनुषंगाने तुम्ही देखील सोनं खरेदीचा विचार करत असाल तर बाजारभावाच्या तुलनेत थोडं स्वस्त सोनं खरेदी करण्याचा पर्याय तुम्हांला सॉव्हरेन गोल्ड स्कीम मधून मिळणार आहे. यंदाच्या सॉव्हरेन गोल्ड बॉन्ड स्कीम मध्ये सोन्याचा दर हा प्रतिग्राम 5177 रूपये इतका ठरवण्यात आला आहे. Diwali 2020: यंदा दिवाळीच्या दिवशी 17 वर्षांनंतर सर्वार्थसिद्धि योग; पुष्य नक्षत्रापासून दिवाळी पर्यंत महत्त्वाच्या खरेदीचे 7 शुभ मुहूर्त!

नोव्हेंबर 2015 पासून दर महिन्यात विशिष्ट काळासाठी सरकारच्या वतीने आरबीआय ही Sovereign Gold Bond scheme जाहीर करते. त्यामधेय एका काळासाठी ठराविक रक्कमेमध्ये सोनं खरेदीची संधी ग्राहकांना उपलब्ध करून दिली जाते.

Sovereign Gold Bond Scheme 8वी सीरीज

  • यंदा Sovereign Gold Bond scheme 2020-21 ची 8 वी सीरीज 9 ते 13 नोव्हेंबर दरम्यान खुली असेल.
  • या गोल्ड स्कीममध्ये सोन्याचा दर हा प्रतिग्राम 5177 रूपये इतका आहे. डिजिटल पेमेंट केल्यास तुम्हांला 50 रूपये सूट मिळू शकते. म्हणजेच 5127 रूपयांमध्ये तुम्हांला प्रतिग्राम सोनं विकत घेता घेऊ शकतं.
  • वैयक्तिक ग्राहकाला किमान 1 ग्राम ते 4 किलो सोनं विकत घेता येऊ शकतं तर ट्र्स्ट साठी 20 किलोपर्यंतची मुभा आहे.
  • गोल्ड बॉन्डची मुदत 8 वर्षांसाठी असते. दरम्यान 5 वर्षांनंतर तुम्हांला एक्झिटचा पर्याय असतो.
  • सॉव्हरेन गोल्ड बाँडमध्ये 2.5 टक्क्यांचे व्याज मिळते. तसेच यावर कर्ज देखील मिळू शकते.

दरम्यान दिवाळी आणि त्यामधील पाडवा, धनतेरस या सणाच्या दृष्टीने सराफा दुकानांमध्ये सोनं खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी असते. शुभ मुहूर्तावर सोनं देखील खरेदी करण्याला अनेक जण प्राधान्य देतात मात्र अशामध्ये अनेकदा मागणी वाढली की दिवसागणिक बाजारातील सोन्याचा भाव देखील वाढतो. त्यामुळे त्या तुलनेत स्वस्त दरात सोनं खरेदी करायचं असल्यास गोल्ड बॉन्ड हा एक उत्तम पर्याय आहे. आरबीआयच्या माहितीनुसार गोल्ड मध्ये सोन्याचा दर हा भारत बुलियन अँड असोसिएशन लिमिटेडकडून हे बाँड जारी करण्याच्या आधीच्या आठवड्यातील शेवटच्या 3 व्यवहाराच्या दिवसात 999 शुद्धतेच्या सोन्याच्या किंमती पाहून ठरवल्या जातात.