SIM Card (Photo Credit - pixabay)

SIM Card New Rule: प्रत्येक महिन्याच्या सुरुवातीला विविध बाबींसंदर्भातील नियमांमध्ये बदल होतो. आता भारताचा दूरसंचार विभाग (DoT) 1 डिसेंबर 2023 पासून सिम कार्डसाठी (SIM Card) नवीन नियम (New Rule) लागू केले आहेत. हे नियम 1 ऑगस्ट 2023 रोजी जाहीर करण्यात आले होते. ते 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू होणार होते. मात्र, त्याला दोन महिन्यांचा विलंब झाला. मात्र, आता आजपासून या नियमांची अंमलबजावणी होणार आहे.

नवीन सिम कार्ड नियम बदलण्याच्या मागे सिम स्वॅप स्कॅम, बनावट सिम आणि इतर ऑनलाइन फसवणूक यांसारख्या घोटाळे थांबवणे हा उद्देश आहे. नवीन सिम कार्डचे नियम नवीन सिम कार्ड जारी करणे सुलभ करण्यासाठी तयार करण्यात आले आहेत. चला तर मग नवीन सिम कार्ड नियमांबद्दल सविस्तर जाणून घेऊयात...(New SIM Card Rules Effective December 1: नवीन सिम कार्ड खरेदीसाठी 1 डिसेंबरपासून नवे नियम लागू; घ्या जाणून)

ई-केवायसी -

नवीन सिम कार्ड आणि सध्याच्या क्रमांकावरून सिम मिळवू इच्छिणाऱ्यांसाठी ई-केवायसी किंवा डिजिटल केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. याचा अर्थ असा की आता तुम्ही सिम कार्ड मिळवण्यासाठी तुमच्या ओळखपत्राची प्रत देऊ शकत नाही.

एका आयडीवर 9 सिम खरेदी करता येणार -

नवीन नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात सिम कार्ड जारी करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. व्यावसायिक व्यक्ती अजूनही मोठ्या प्रमाणात सिम खरेदी करू शकतील, परंतु नियमित वापरकर्त्यांना एकाच आयडीवर नऊ सिम खरेदी करण्याची मर्यादा असेल. (हेही वाचा - SIM Swap Fraud: आता सिम कार्ड स्वॅप करून होत आहे फसवणूक; जाणून घ्या बँकिंग घोटाळ्यापासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स)

बंद केलेले सिम पुन्हा चावू करणे -

बंद केलेले सिमकार्ड 90 दिवसांच्या कालावधीसाठी पुन्हा जारी केले जाऊ शकत नाहीत. तसेच चोरीला गेलेला किंवा बंद केलेला नंबर 3 महिन्यांनंतरच दुसऱ्याला दिला जाईल.

सिम डीलर व्हेरिफिकेशन -

आजपासून म्हणजेच 1 डिसेंबर 2023 पासून, केवळ अधिकृत डीलरच ग्राहकांना सिम कार्ड जारी करू शकतील. यासाठी व्यक्तींना विस्तृत पडताळणी प्रक्रियेतून जावे लागेल. टेलीकॉम ऑपरेटर्सना संशयास्पद व्यक्तींना सिम कार्ड देण्यापासून रोखण्यासाठी फ्रँचायझी, वितरक आणि पॉइंट-ऑफ-सेल (पीओएस) एजंट्सची नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीशिवाय सिमकार्ड जारी करणाऱ्यांना ₹10 लाखांपर्यंत दंड होऊ शकतो.