Representational Image | (Photo Credits: PTI)

आजकाल लोकांची फसवणूक करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर केला जात आहे. यातील एक चिंताजन गोष्ट म्हणजे ‘सायबर फसवणूक’. चोरटे तंत्रज्ञानाच्या मदतीने अगदी सफाईने लोकांची बँक खाती रिकामी करत आहे. आता इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) 4 जानेवारी 2023 रोजी 'सायबर जागरुकता दिवस 2023' साजरा करत आहे. याद्वारे इंटरनेट वापरकर्त्यांना सायबर फसवणूक आणि सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्याबद्दल जागरूक केले जात आहे.

सोशल मिडियावर CERT-In ने फसवणुकीच्या सिम स्वॅप प्रकाराबाबत माहिती देत लोकांना सावध राहण्यास सांगितले आहे. सिम स्वॅप घोटाळा हा सायबर फसवणुकीचा एक चिंताजनक प्रकार आहे, ज्यामध्ये चोरटे तुमच्याकडून OTP न मागता तुमच्या बँक खात्यातून पैसे काढून घेऊ शकतात. सिम स्वॅप फसवणूक करताना चोरटे फोनच्या टू-फॅक्टर सिक्युरिटीमधील त्रुटीचा फायदा घेऊन वापरकर्त्याच्या फोन नंबरचा वापर करून, त्याच्या फोनमध्ये प्रवेश करतात. आता CERT-In ने याबाबत सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित कसे राहावे यासाठी काही टिप्स देखील शेअर केल्या आहेत.