
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या उमेदवार याद्या जाहीर केल्या व अनेक बंडखोरांना रोखण्याचाही प्रयत्न केला. परंतु आता वेळ आली आहे ती प्रचाराची. प्रचाराच्या या रणधुमाळीत प्रत्येक पक्ष जोरदार शक्तीप्रदर्शन करताना दिसत आहे. पण या राजकीय पक्षांपेक्षा महत्त्वाचे असते ते त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह. कारण हेच चिन्ह त्यांना कधी निवडून देतं तर कधी अपयशाची वाट दाखवतं. चला तर बघूया विविध राजकीय पक्षांच्या निवडणूक चिन्हांचा थोडासा इतिहास.
काँग्रेसच्या पंजामागील इतिहास
भारताच्या स्वतंत्रलढ्याच्या काळात 1885 साली स्थापन झालेल्या काँग्रेस पेक्षाचे आधीचे चिन्ह बैलजोडी हे होते. मात्र स्वातंत्र्यानंतरच्या काळात ते चिन्ह बदलून हाताचा पंजा करण्यात आलं.
भाजपचं कमळ हे चिन्ह कधीपासून?
1951 मध्ये स्थापन झालेला जनसंघ पक्ष म्हणजेच आजची भारतीय जनता पार्टी. या पक्षाचं आधीचं निवडणूक चिन्ह दिवा होतं, पण नंतर ते बदलून नांगरधारी शेतकरी व कालांतराने कमळ असा त्यांच्या चिन्हाचा प्रवास आहे.
घड्याळाचे महत्त्व
1999 साली स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे निवडणुक चिन्ह म्हणजे घड्याळ. या चिन्हाचे महत्त्व म्हणजे हे गतिमान विकासाच्या संकल्पनेवर आधारित आहे.
शिवसेनेच्या धनुष्यबाणा मागचा इतिहास
1966 मध्ये स्थापन झालेल्या शिवसेना पक्षाचे चिन्ह आधी रेल्वे इंजिन होते. परंतु नंतर ते बदलून धनुष्यबाण करण्यात आले.
इतर राष्ट्रीय तसेच प्रादेशिक पक्ष व त्यांची निवडणूक चिन्हे
बहुजन समाज पक्षाचे निवडणूक चिन्ह हत्ती हे समाजाच्या विशाल संख्येचे प्रतीक आहे. तर शेतकरी आणि कामगारांच्या विचारांसाठी लढा देणाऱ्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे चिन्ह कोयता हातोडा आहे. तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे चिन्ह बाली कोयता आहे. अखिल भारतीय तृणमूल काँग्रेसचे चिन्ह राष्ट्रीय ध्वजामध्ये दोन फुले असे आहे. लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाने कंदील, तर सेक्युलर जनता दलाने डोक्यावर धान्य घेतलेल्या महिलेचे चित्र चिन्ह म्हणून स्वीकारले आहे.तसेच आम आदमी पक्षाने झाडू असे चिन्ह आहे तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने रेल्वे इंजिन निवडणूक चिन्ह म्हणून घेतले आहे.