Maharashtra Assembly Election 2019: 'मनसे'च नाही तर शिवसेना पक्षाचंही निवडणूक चिन्ह होतं रेल्वे इंजिन; जाणून घ्या त्या मागचा संपूर्ण इतिहास
MNS logo (Photo Credits: File Image)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी 2006 साली शिवसेना पक्षातून वेगळे होऊन स्वतःच्या राजकीय पक्षाची स्थापना केली. त्यांनी लढलेल्या 2009 सालच्या निवडणुकीत त्यांना यश मिळालेही आणि याच यशासोबत त्यांच्या पक्षाला 'रेल्वे इंजिन' हे निवडणूक चिन्ह मिळालं. परंतु हेच चिन्ह आधी शिवसेना (Shivsena) पक्षाचं होतं.

चला तर पाहूया शिवसेना पक्षाला धनुष्यबाण हे चिन्ह कसं मिळालं...

1988 साली भारतीय निरवणूक आयोगाने सर्वच राजकीय पक्षांना एक स्वतंत्र निवडणूक चिन्ह द्यायचे थेरवले. त्या काळी उगवता सूर्य, नारळ अशी चिन्ह साऱ्यांनाच दिली जायची. पण त्यामुळे होणारा गोंधळ टाळण्यासाठी बाळासाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांशी बोलून धनुष्य बाण हे शिवसेनेचा अधिकृत निवडणूक चिन्ह घ्यायचे ठरवले. आणि त्यानुसार शिवसेनेचे तत्कालीन सरचिटणीस सुभाष देसाई, ऍड. बाळकृष्ण जोशी आणि विजय नाडकर्णी हे सर्व पदाधिकारी दिल्लीत पोहोचले आणि शिवसेना पक्षाच्या नोंदणीसोबतच धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह मिळवण्यास यशस्वी झाले.

धनुष्यबाण मिळण्या आधी 'या' चिन्हासोबत लढवली होती निवणूक...

अलीकडेच दादरच्या एका जुन्या शिवसैनिकाने शेअर केलेला शिवसेना सभेचा फोटो म्हणजे हा

हा फोटो धनुष्य बाण हे निवडणूक चिन्ह शिवसेनेला मिळण्या आधीच आहे. या फोटोत आपण बघू शकता की शिवसेनेच्या सभेमध्ये मनोहर जोशी भाषण करत आहेत तर बाळासाहेब मागे बसले आहेत. तसेच मागे लावण्यात आलेल्या बॅनरवर रेल्वे इंजिन हे चिन्ह दिसत आहे.