RBI (Photo Credits: PTI)

NEFT/ RTGS New Rule: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एनईएफटी (NEFT) आणि आरटीजीएस (RTGS) व्यवहारांसाठी नियम बदलले आहेत. मध्यवर्ती बँकेने एक अधिसूचना जारी केली आहे की, पेमेंट सिस्टममध्ये भाग घेणाऱ्या बँकांना कोअर बँकिंग सोल्यूशनमध्ये बदल करावे लागतील, जेणेकरून NEFT आणि RTGS द्वारे येणाऱ्या परदेशी देणग्यांची माहिती रेकॉर्ड करता येईल.

विदेशी योगदान कायदा (एफसीआरए) संबंधित व्यवहारांसाठी एनईएफटी आणि आरटीजीएस प्रणालींमध्ये आवश्यक बदल करण्यात आल्याचे आरबीआयकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे. हे नवे बदल 15 मार्चपासून लागू होणार आहेत. (हेही वाचा -LPG Cylinder Price: स्वयंपाकाच्या गॅसबाबत मोठा दिलासा; LPG सिलेंडर 500 रुपयांना मिळणार? कोणाला घेता येणार फायदा? जाणून घ्या)

मध्यवर्ती बँकेने जारी केलेल्या परिपत्रकात असे म्हटले आहे की, एफसीआरएशी जोडलेल्या एनईएफटी आणि आरटीजीएस प्रणालीमधील व्यवहार केवळ एसबीआयच्या नवी दिल्ली मुख्य शाखेच्या (एनडीएमबी) एफसीआरए खात्यात केले जातील. एफसीआरए अकाऊंटमध्‍ये पैसे थेट विदेशी बँका आणि भारतीय मध्यस्थ बँकांकडून NEFT आणि RTGS प्रणालींद्वारे SWIFT द्वारे मिळू शकतात.

परिपत्रकात पुढे म्हटले आहे की, मंत्रालयाला दान करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव, पत्ता, रक्कम, कोणत्या देशातून देणगी देण्यात आली आणि देणगीचा उद्देश काय होता? याची संपूर्ण माहिती दिली जाईल. अशाप्रकारे परदेशातून येणाऱ्या देणग्यांची सर्व माहिती सरकारकडे असेल. हे निर्देश पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम्स अॅक्ट, 2007 च्या कलम 18 सह वाचलेल्या कलम 10(2) अंतर्गत जारी करण्यात आले आहेत.