
LPG Cylinder Price: गेल्या काही दिवसांपासून स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात वाढ झाल्याने जनतेला महागाईचा सामना करावा लागत आहे. सध्या स्वयंपाकाच्या गॅसची किंमत 1 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. दिल्लीत 14.2 किलो एलपीजीची किंमत 1053 रुपये, मुंबईत 1052.50 रुपये आणि कोलकात्यात 1079 रुपये आहे. तथापि, आपण कमी पैशात सिलेंडर खरेदी करू शकता.
स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचा लाभ तुम्ही फक्त 500 रुपयांमध्ये घेऊ शकता. हा लाभ तुम्हाला सरकारी योजनेअंतर्गत दिला जाईल. मात्र, हा लाभ त्याअंतर्गत पात्र असलेल्या लोकांनाच दिला जाईल. या योजनेअंतर्गत तुम्हाला 500 रुपयांमध्ये सिलिंडर कसा मिळेल आणि त्याचा लाभ कोणाला दिला जाईल हे जाणून घेऊयात...(हेही वाचा - 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! होळीपूर्वी 'इतक्या' टक्क्यांनी वाढू शकतो महागाई भत्ता)
उज्ज्वला योजना -
उज्ज्वला योजनेंतर्गत 76 लाख कुटुंबांना 500 रुपयांना एलपीजी सिलिंडर देण्यात येणार आहे. राजस्थान सरकारने आपल्या चालू कार्यकाळातील अर्थसंकल्पात ही घोषणा केली आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी 2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणात 500 रुपयांना गॅस सिलिंडर मिळणार असल्याचे सांगितले. 2022 मध्येच, गेहलोत सरकारने सूचित केले होते की दारिद्र्यरेषेखालील (BPL) लोक एका वर्षात 500 रुपये दराने 12 सिलिंडर घेऊ शकतील.
कोणाला मिळणार स्वस्तात गॅस -
जर तुम्ही राजस्थान राज्याचे रहिवासी असाल आणि तुम्ही दारिद्र्यरेषेखालील असाल, म्हणजे BPL श्रेणीत असाल तर तुम्हाला LPG सिलेंडरचा लाभ दिला जाईल. राजस्थानमध्ये दुसऱ्या राज्यातील नागरिक राहत असल्यास त्याला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतरच लाभ दिला जाईल.
जर तुम्ही राजस्थानचे नागरिक असाल आणि दारिद्र्यरेषेखालील असाल तर तुम्हाला 500 रुपयांचा एलपीजी सिलिंडर मिळवण्यासाठी उज्ज्वला योजनेअंतर्गत अर्ज करावा लागेल. अर्ज करण्यासाठी, तुमच्याकडे रेशनकार्ड व्यतिरिक्त आधार कार्ड आणि उत्पन्न, रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. या कागदपत्रांसह तुम्ही अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज करू शकता.