e-KYC Process for Ration Cards via Mera e-KYC (Photo Credits: Google Play Store)

रेशनकार्ड धारकांना (Ration Card) आता ई केवायसी (e-KYC) करणं बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी 31 मार्चपर्यंतची मुदत नागरिकांना देण्यात आली आहे. जर ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर अनेकांना रेशनकार्ड वर मिळणार्‍या फायद्यांपासून वंचित रहावं लागणार आहे. लाभार्थ्यांना ही प्रक्रिया मोबाईल अ‍ॅप किंवा रेशन दुकानदारांकडूनही पूर्ण करता येणार आहे.त्यामुळे लाभार्थ्यांनी अजूनही ही प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर ती लवकरात लवकर पूर्ण करावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

Mera e-KYC किंवा Aadhaar Face RD service app वरून ही प्रक्रिया पूर्ण करता येऊ शकते. e-PoS machines, वरील fingerprint authentication च्या समस्या सोडवण्यासाठी, अधिकाऱ्यांनी रेशन कार्डधारकांसाठी iris scanning सुरू केले आहे. ई-केवायसी पडताळणीसाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या जवळच्या रेशन दुकानाला भेट द्यावी.

आवश्यक कागदपत्रं कोणती?

रेशनकार्ड ई-केवायसी प्रक्रियेचे प्रमाणीकरण करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आवश्यक आहे. जर तुम्ही रेशन दुकानात जात असाल तर तुमचे आधार कार्ड आणि रेशन कार्ड दोन्ही सोबत ठेवा.

रेशनकार्ड ई-केवायसी प्रक्रिया कशी पूर्ण कराल?

  • The Mera eKYC app डाऊनलोड करा. (हे Google Play Store वर आहे Apple App Store वर उपलब्ध नाही.)
  • AadhaarFaceRD app देखील इन्स्टॉल करा.
  • अ‍ॅप ओपन करा आणि लोकेशन आणि कॅमेरा अ‍ॅक्सेसची परवानगी द्या.
  • तुमचे राज्य, केंद्रशासित प्रदेश किंवा रिजन निवडा.
  • तुमचा आधार क्रमांक टाका आणि जनरेट ओटीपी वर टॅप करा.
  • तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला OTP एंटर करा आणि captcha पूर्ण करा.
  • आता लाभार्थ्यांचे नाव, राज्य, जिल्हा, Aadhaar e-KYC status दिसेल.
  • Face e-KYC वर टॅप करा, अटी स्वीकारा आणि UIDAI सोबत रेशन कार्ड तपशील शेअर करण्यास संमती द्या.
  • संमती बॉक्सवर टिक करा,Proceed वर टॅप करा आणि स्कॅनिंगसाठी तुमचा चेहरा ऑन-स्क्रीन वर्तुळात जुळवून घ्या.
  • एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर, तुमची ई-केवायसी स्थिती स्क्रीनवर अपडेट केली जाईल.

Ration Card e-KYC Status कसं तपासाल?

Mera eKYC app उघडा आणि तुमचे लोकेशन, आधार क्रमांक, ओटीपी आणि captcha टाका.लाभार्थी तपशील अंतर्गत, जर ई-केवायसी स्थिती "Y" दाखवत असेल, तर तुमची पडताळणी यशस्वी झाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च ही अंतिम मुदत आहे आणि ई-केवायसी पूर्ण करण्यात अयशस्वी झाल्यास रेशन पुरवठा खंडित होऊ शकतो. लाभार्थी ही प्रक्रिया ऑनलाइन पूर्ण करू शकतात किंवा ऑफलाइन पडताळणीसाठी रेशन दुकानाला भेट देऊ शकतात.