PPF Minor Account: 100 रूपयांची गुंतवणूक करून तुमच्या चिमुकल्याचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी 'हे' आहे परफेक्ट Children's Day Gift!
PPF Account | Image used for representational purpose | (Photo Credits: Pixabay)

Children's Day Gift Ideas 2019:  पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन भारतामध्ये 'बालदिन'(Children's Day) म्हणून साजरा केला जातो. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांना लहान मुलांची विशेष आवड होती. त्यामुळे त्यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून बालदिन साजरा करण्याची पद्धत आहे. वाढती महागाई, स्पर्धा दिवसेंदिवस तीव्र होत आहेत. त्यामुळे तुमच्या चिमुकल्यांचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आजपासूनच बचत करण्यासाठी सुरूवात करा. त्यासाठी PPF Minor Account हा एक उत्तम पर्याय आहे. याच्या माध्यमातून तुमच्या मुलांचं भविष्य सुरक्षित करण्याचा एक नवा पर्याय तुमच्या समोर आहे. Children's Day Special Gift Ideas: बालदिनाच्या निमित्त तुमच्या लहानग्यांना दाखवा 'ही' 5 मराठी बालनाट्य; गिफ्टसाठी ठरेल बेस्ट पर्याय.

PPF Minor Account हे तुमच्या नजीकच्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही सहज उघडू शकता तसेच किमान 100 रूपयांच्या दरमहा हफ्त्याने तुम्ही त्याची सुरूवात करू शकता. किमान 15 वर्ष या अकाऊंटची कालमर्यादा आहे. ही कालमर्यादा तुम्ही वाढवू देखील शकता. त्यामुळे यंदा बालदिनी तुमच्या मुलांच्या आर्थिक दृष्ट्या सुरक्षिततेमधून हा एक पर्याय म्हणजे तुमच्या मुलांसाठी बालदिनाचं एक उत्तम गिफ्ट ठरणार आहे.

PPF Minor Account चं एक वैशिष्ट्यं म्हणजे ज्या व्यक्तीकडून हे अकाऊंट बनवलं जातं त्याला या पॉलिसीचा फायदा घेऊन आयकर मध्ये सूट मिळवता येऊ शकते. त्यामुळे ही गुंतवणूक दोघांनाही फायदेशीर आहे. सध्या पीपीएफ अकाऊंटवर सुमारे 7.9% इंटरेस्ट मिळतो भविष्यात 25 वर्षांसाठी या गुंतवणूकीवर 8% व्याज मिळते.