भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) ने आपल्या ग्राहकांसाठी गॅस सिलेंडर बुकिंग प्रक्रिया अतिशय सोपी केली आहे. आता गॅस बुकिंग करण्यासाठी मोबाईल फोनमध्ये इंटरनेट सुविधा लागणार नाही. आता ग्राहक त्यांच्या आवाजानेचं एलपीजी सिलिंडर बुक करू शकणार आहेत. गावातील दुर्गम भागात राहणाऱ्या आणि स्मार्टफोन आणि इंटरनेट सुविधा नसलेल्या लोकांसाठी ही सुविधा गेम चेंजर ठरेल.
आता भारत पेट्रोलियमचे ग्राहक सिलिंडर बुकिंगसाठी 'UPI123PAY' वापरून गॅस बुकिंगवर डिजिटल पेमेंट करू शकतात. त्यामुळे ग्राहक आपल्या आवाजाने गॅस सिलिंडर बुक करू शकतील. कंपनीच्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ही सुविधा सुरू केल्यानंतर, गावात राहणार्या 4 कोटींहून अधिक बीपीसीएल ग्राहकांना या योजनेचा लाभ मिळेल. (वाचा - Railwire Sathi Kiosk Service: रेल्वेने सुरू केली खास सुविधा; आता स्टेशनवर PAN Card आणि Aadhar Card बनवता येणार)
RBI ने फीचर फोनसाठी सुरू केली UPI123PAY सुविधा -
गेल्या आठवड्यातच केंद्रीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी देशभरात UPI123PAY डिजिटल पेमेंट सुविधा सुरू केली. हा पेमेंट मोड सुरू झाल्यापासून, देशातील 400 दशलक्ष फीचर फोन वापरकर्ते आता डिजिटल पेमेंट मोडमध्ये सामील झाले आहेत.
ही डिजिटल पेमेंट सुविधा सुरू केल्यापासून BPCL ही UPI123PAY शी टाय-अप करणारी पहिली कंपनी आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहक 080-4516-3554 या क्रमांकावर कॉल करून त्यांचे गॅस सिलिंडर बुक करू शकतात.
दरम्यान, तुम्ही या नंबरद्वारे पैसे भरू शकता. यासोबतच RBI ने UPI123PAY सोबत 24*7 हेल्पलाइन Digisathi देखील सुरू केली आहे. ज्याच्या मदतीने लोक त्यांना पाहिजे तेव्हा डिजिटल पेमेंटमधील गैरसोय तपासून मदत मिळवू शकतात. ही सुविधा सुरू झाल्यापासून आतापर्यंत ग्राहकांनी 1 कोटी व्यवहार केले आहेत. काही दिवसांत हा आकडा 100 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे.