Railwire Sathi Kiosk Service: रेल्वेने सुरू केली खास सुविधा; आता स्टेशनवर PAN Card आणि Aadhar Card बनवता येणार
Railway Station ( Photo Credit -Wikimedia Commons)

Railwire Sathi Kiosk Service: भारतीय रेल्वे प्रवाशांना वेळोवेळी विविध सुविधा देत असते. आता काही भागात रेल्वे स्थानकांवर एक नवीन सुविधा सुरू होणार आहे. प्रवाशांना आता स्थानकांवर पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड (Aadhar Card) बनवता येणार आहे. या सुविधेसाठी स्टेशनवर कियोस्क उभारण्यात येत आहेत. त्यांचे नाव 'रेलवायर साथी कियोस्क' (Railwire Sathi Kiosk) असे देण्यात आले आहे. सध्या 200 रेल्वे स्थानकांवर ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

अशा परिस्थितीत जर प्रवासी ट्रेनची वाट पाहत असतील किंवा कोणी येण्याची वाट पाहत असतील तर ते या किऑस्कवर जाऊन आधार किंवा पॅन कार्ड बनवू शकतात. याशिवाय या स्थानकांवर प्रवाशांना त्यांचे फोन रिचार्ज करण्याची आणि वीज बिल भरण्याची सुविधाही मिळणार आहे. सध्या ईशान्य रेल्वेच्या दोन स्थानकांवर ही सुविधा सुरू झाली आहे. त्याचबरोबर इतर स्थानकांवर ही सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे. (हेही वाचा - Train Coach Booking for Marriage: आता वऱ्हाडी घेऊन जाण्यासाठी संपूर्ण ट्रेन बुक करता येणार; 'इतका' येईल खर्च)

दरम्यान, RailTel द्वारे देशभरातील 200 रेल्वे स्थानकांवर कॉमन सर्व्हिस सेंटर Kiosk बसवले जात आहेत. पहिल्या टप्प्यात वाराणसी शहर आणि प्रयागराज रामबाग येथे Kiosk उभारण्यात आले आहेत. दुसऱ्या टप्प्यात अन्य प्रमुख स्थानकांवर ही सुविधा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. त्यासाठी स्थानकांचे मार्किंग केले जात आहे.

या Kiosk वर कर भरण्याची सुविधाही उपलब्ध असेल. यासोबतच ट्रेन, फ्लाइट आणि बसचे तिकीटही बुक करता येणार आहे. त्याचबरोबर बँकिंग, विमा आणि इतर अनेक सुविधाही येथे उपलब्ध असतील. सरकारने स्थानिक स्तरावर सरकारी कामांचा निपटारा करण्यासाठी कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) उघडण्यास सुरुवात केली आहे. त्यासाठी शासनाकडून परवाना घ्यावा लागतो. या ठिकाणी वीजबिल, फोन बिल, फोन रिचार्ज, विमा, आधार आणि पॅनकार्ड बनवण्याचे काम केले जाते.